तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने होऊ घातलेल्या २९ जूनच्या जागरण-गोंधळ आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे़ महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक आण्णासाहेब पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली़मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यभरात ५८ मूक मोर्चे झाले़ मुंबईच्या मोर्चानंतर एक महिन्यात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते़ यावेळी काही घोषणा सरकारने केल्या होत्या़ मात्र, या घोषणांवरही अंमलबजावणी केली नाही़ मुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून समाजाचा विश्वासघात केला आहे़ आता हे सरकार मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही, हे स्पष्ट झाल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला़ यामुळेच आता मुक नाही तर ठोक मोर्चे काढले जातील, ही भूमिका घेऊन आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु करीत आहोत़ यात छञपती शिवाजी महाराज यांच्या नितीप्रमाणे गनिमी कावा पध्दतीने आंदोलने करण्यात येणार आहेत़ यापुढे सरकारला कुठलेही निवेदन दिले जाणार नाही, ना चर्चा करु, असेही आण्णासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी महेश सावंत, जिवनराजे इंगळे, सुनिल नागणे, अर्जून सांळुके, बबन सुद्रिके उपस्थित होतेमोर्चासाठी समित्या स्थापऩतुळजापुरातील जागरण-गोंधळ आंदोलनाचे संयोजक तुळजापूर-उस्मानाबाद आहेत़ मोर्चा यशस्वीतेसाठी आठ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत़ या आंदोलनाचे नियोजनही पुर्वीच्या मोर्चा प्रमाणेच राहणार असून, स्वछता, शांततेला महत्त्वाचे स्थान राहणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली़
२९ जूनला मोर्चा; ‘जागरण-गोंधळा’ची तयारी पूर्ण, मराठा समाज आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:42 IST