शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

पालक गमावलेल्या बालकांवर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : कोरोनामुळे अनेकांच्या घरातील कर्ती माणसं निघून गेली आहेत. याचप्रमाणे अनेक बालकांच्या भाळी अकाली अनाथाचा शिक्का बसला. भविष्य ...

उस्मानाबाद : कोरोनामुळे अनेकांच्या घरातील कर्ती माणसं निघून गेली आहेत. याचप्रमाणे अनेक बालकांच्या भाळी अकाली अनाथाचा शिक्का बसला. भविष्य अंधकारमय झालेले असतानाच शासन त्यांच्या परीने या बालकांसाठी योजना आखत आहे. मात्र, त्यातही आरोग्याविषयीचा अद्याप कोठे उल्लेख होताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेत उस्मानाबादेतील बालरोगतज्ज्ञ डॉ. रामचंद्र खुने यांनी पुढाकार घेत अशा बालकांची मोफत तपासणी करून मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात कोरोना संसर्गाने ज्येष्ठ नागरिकांना आपले लक्ष्य केले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत तरुण व प्रौढ कोरोनाचे भक्ष्य ठरले आहेत. सुमारे ५० टक्केपेक्षाही अधिक रुग्ण १८ ते ४५ या वयोगटातील आढळून येत आहेत. परिणामी, या वयोगटातील मृत्यूचे प्रमाणही पहिल्या लाटेपेक्षा अधिक झाले आहे. हे वय जीवनातील उमेदीचा काळ असतो. घराची जबाबदारी, लग्न, कुटुंबकबिला सावरण्याचा असतो. याच काळात कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे कुटुंब अडचणीत आलेच. मात्र, लहान बालकांचे भवितव्य अंधारात चाचपडू लागले आहे. सध्या एक पालक तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यांना पीएम केअर्स तसेच राज्य शासनाच्या माध्यमातूनही मदत करण्याच्या योजना आखल्या जात आहेत. यात आरोग्याचा विषयही अंतर्भूत होणे गरजेचे आहे. दरम्यान, शासन मदतीसाठी पुढे यईल तेव्हा येईल. उस्मानाबादेतील बालरोगतज्ज्ञ डॉ. रामचंद्र खुने यांनी मात्र सामाजिक बांधिलकी जोपासत एक स्तुत्य पुढाकार घेतला आहे. ज्या बालकांचे माता किंवा पिता किंबहुना दोघेही कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत, अशा बालकांवर ते १४ वर्षांचे होईपर्यंत मोफत तपासणी, औषधोपचाराची जबाबदारी डॉ. खुने यांनी स्वीकारली आहे. इतकेच नव्हे तर एखाद्या उपचाराची सोय त्यांच्याकडे नसली तरी ते अन्य रुग्णालयांची मदत घेण्यासाठीही पुढाकार घेत आहेत. कोरोनासारख्या अशा गंभीर काळात एकीकडे आरोग्य यंत्रणेवर शंका उपस्थित केली जात असतानाच डॉ. खुने यांनी उचललेले पाऊल हे दिशादर्शक ठरणारे आहे.

ज्येष्ठांसाठीही हवा पुढाकार...

ज्याप्रमाणे पालक गमावलेल्या बालकांसाठी शासन तसेच डॉ. खुने यांच्यासारखी सामाजिक बाधिलकी जपणारे डॉक्टर पुढे येत आहेत, असेच प्रयत्न ज्येष्ठ नागरिकांसाठीही होण्याची गरज आहे. महामारीत अनेक घरातील कर्ते मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्यामागे घरातील ज्येष्ठांचे मोठे हाल होतील. त्यांच्याही आरोग्यसेवेसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

कोट...

आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर लहान बालकांना काय यातना सोसाव्या लागतात, हे एक डॉक्टर म्हणून काम करताना अनुभवले आहेच. मात्र, समाजात वावरतानाही ते प्रकर्षाने दिसून येते. अशा बालकांसाठी आपल्याकडून जे काही करता येणे शक्य आहे, ते करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. अशी बालके १४ वर्षांची होईपर्यंत त्यांच्या तपासणीची - औषधोपचाराची जबाबदारी याच भावनेतून स्वीकारत आहे.

- डॉ. रामचंद्र खुने, बालरोगतज्ज्ञ