शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

बोअरची मोटर काढताना शॉक लागून चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:49 IST

कप्पी घटनास्थळावरील उच्चदाब वीज वाहिनीवर कोसळल्याने त्यावर काम करीत असलेल्या चौघांना विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

दयानंद काळुंखे -

अणदूर (जि. धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील एका शेतकऱ्याच्या बोअरची बिघडलेली मोटार बाहेर  काढताना शनिवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. कप्पी घटनास्थळावरील उच्चदाब वीज वाहिनीवर कोसळल्याने त्यावर काम करीत असलेल्या चौघांना विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

 केशेगाव शिवारातील दुर्घटनेत शेतकरी नागनाथ काशीनाथ साखरे (वय ५६), रामलिंग नागनाथ साखरे (३०), तर मजूर म्हणून काम करणारे काशिम कोंडाजी फुलारी (४७), रतन काशिम फुलारी (१६) यांचा मृत्यू झाला. यातील नागनाथ साखरे व रामलिंग साखरे हे बापलेक तर, काशिम फुलारी व रतन फुलारी हेही दोघे बापलेक होते. केशेगाव येथील नागनाथ साखरे यांच्या शेतात दोन्ही बाजूने उच्चदाब वीजवाहिनी गेली आहे. या वाहिनीशेजारी असलेल्या बोअरमधील बिघाड झालेली मोटार काढण्यासाठी शनिवारी दुपारी उपरोक्त चौघेही क्रेनच्या कप्पीवर काम करीत होते.

कप्पी वाहिनीवर कोसळलीकप्पीचा अचानक तोल गेल्याने ती खाली पडून नुकसान होऊ नये, यासाठी चौघांनीही त्यास सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कप्पी उच्चदाब वाहिनीवर कोसळली. यावेळी चौघांनाही जबर विद्युत शॉक लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

ही घटना कळताच नळदुर्ग ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे, कर्मचारी एस. ए. कोळी, महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रतीक खापरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Four Die of Electric Shock While Removing Borewell Motor

Web Summary : A tragic accident in Keshegaon claimed four lives. While removing a borewell motor, a crane's pulley hit a high-voltage line, electrocuting a farmer, his son, and two laborers. All died instantly.
टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी