तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे श्रध्दा बहु. सामाजिक संस्था व आई प्रतिष्ठान यांच्या वतीने सुरू असलेल्या चारा छावणीत बुधवारी शेकडो व-हाडींच्या उपस्थितीत छावणीतील दोन शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा विवाह सोहळा पार पडला.राज्यातच सध्या भीषण पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर छावणीचालक सतीशकुमार सोमाणी यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भंडारवाडी येथील सोनाली जोतीराम एडके व ज्ञानेश्वर पारप्पा देवकर (कार्ला) आणि तेर येथील निकिता बाळू देडे व गणेश लहू गवळी (रा. कळंब) यांचा विवाह पार पडला.>संसारोपयोगी साहित्य दिले भेटविवाह सोहळ्यात पशुपालकच वºहाडी अन् वाढपीही बनले. पशुपालक विवाहात पडेल ते काम करीत असताना दिसून आले.वधू-वरास पोषाख, मणी-मंगळसूत्रासह संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. या सोहळ्यास खासदार ओम राजेनिंबाळकर, जिल्हा शिवसेना प्रमुख कैलास पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, उस्मानाबादचे तहसीलदार विजय राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चारा छावणीतच बांधल्या रेशीमगाठी, पशुपालकच बनले व-हाडी अन् वाढपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 05:00 IST