शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बसस्थानकावर झळकले धाराशिव, पाट्याही बदलणार

By सूरज पाचपिंडे  | Updated: March 1, 2023 18:48 IST

उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव झाल्यानंतर तालुका, जिल्ह्याचे नावही धाराशिव करण्याबाबत शासनाकडून मंजूरी मिळाली मिळाली आहे.

धाराशिव : शहर, तालुका, जिल्ह्याचे नाव धाराशिव झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील सर्व आगारांना उस्मानाबाद ऐवजी धाराशिव नाव वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने अंमलबजावणीस सुरुवात झाली असून, बुधवारी मध्यवर्ती बसस्थानकाचे फलकावर धाराशिव नाव लिहिण्यात आले आहे.

उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव झाल्यानंतर तालुका, जिल्ह्याचे नावही धाराशिव करण्याबाबत शासनाकडून मंजूरी मिळाली मिळाली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी बसेसच्या पाट्या बदलण्याबाबत आदेश जिल्ह्यातील सर्व आगारांना मंगळवारी दिले आहेत. त्या अनुषंगाने धाराशिव आगाराने काम हाती घेतले आहे. बुधवारी बसस्थानकाचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. शिवाय, आगारातील बसेसच्या पाट्या बदलण्याचे कामही सुरु असून, दोन दिवसात आगारातील सर्व बसेसच्या पाट्या बदलण्यात येणार आहेत. काही बसेसवरील पाट्या बदलण्यातही आल्या आहेत. पाट्या बदलण्यासाठी धाराशिव आगाराचा १५ हजार रुपयांचा खर्च होणार आहे.

उद्घोषणेतही झाला बदलमध्यवर्ती बसस्थानकातून विविध मार्गावर बसेस धावत असतात. मार्गस्थ होणाऱ्या बस गाड्यांची उद्घोषणेतेही बुधवारपासून बदल करण्यात आला आहे.

तिकिटावर दिसणार धाराशिवराज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील तिकिटावरील नावही बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुरुवारपासून तिकिटावरही धाराशिव असा शहराचा उल्लेख असेल, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

इतर आगाराकडून अंमलबजावणीधाराशिव जिल्ह्यातील धाराशिव आगाराप्रमाणेच उमरगा, भूम, कळंब, तुळजापूर, परंडा या आगारातील बसेसच्या पाट्या बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्या सर्व आगारातील बसेसवर आता उस्मानाबाद ऐवजी धाराशिव नाव वाचावयास मिळणार आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादstate transportएसटी