सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता, विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी गणपती येण्यापूर्वी संपूर्ण शहरात लगबग सुरू होती. घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या या बाप्पाची आराधना करताना १० दिवस कधी संपले, कळलेच नाही. शहरात साजऱ्या झालेल्या या आनंदोत्सवाची रविवारी सांगता झाली. '' गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…'' अशा घोषणा देत शहरातील मानाचे गणपती, विविध मंडळे आणि नागरिक व चिमुकल्यांनी बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनाचे औचित्य साधून छत्रपती गणेश मित्र मंडळाच्या वतीने नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन केले होते. शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन व तसेच घरगुती गणपतींचे विसर्जन पालिका प्रशासनाने नियोजित केलेल्या देशमुख विहीर, रघुनाथ आड व शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गाव तलावाच्या घाटावर बाप्पाला निरोप देण्यात आला. पालिका प्रशासनाकडून नियोजित केलेल्या विसर्जन घाटावर पालिका कर्मचाऱ्यांसह पोलीस कार्यरत होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोनि सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विविध चौकामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ना ढोल ताशांचा गजर, ना मिरवणूक अशा वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
200921\psx_20210920_102326.jpg
वॅक्सिंन घेतल्यानंतर प्रमाणपत्र देताना छत्रपती गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते...