शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'डीएचओ'च्या स्कॅन स्वाक्षरीने उमेदवारांना फेक नियुक्तीपत्रे; भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 12:26 IST

धक्कादायक : अतिरिक्त 'डीएचओ'च्या स्कॅन स्वाक्षरीचा गैरवापर 

- बाबुराव चव्हाण उस्मानाबाद - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नुकतीच कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. याच यादीतील उमेदवारांना थेट अतिरिक्त डीएचओ' यांच्या स्कॅन स्वाक्षरीने अज्ञात भामट्यानी मोबाईलवर नियुक्तीपत्र धाडून पैशांची मागणी केली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून स्टाफ नर्ससह अन्य पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यातील पात्र उमेदवारांच्या कागदपात्रांची छाननी केल्यानंतर यादी प्रसिध्द करण्यात आली होती. हीच संधी साधत अज्ञात भामट्यांनी यादीतील उमेदवारांना फोन करून ''मी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी बोलत आहे. तुम्ही सदरील भरतीतून अपात्र झाले आहेत. मी तुम्हाला पात्र करतो. त्यासाठी तुम्हाला नियुक्ती आदेश मिळण्यापूर्वी काही व आदेश मिळाल्यानंतर उर्वरित पैसे द्यावे लागतील'', असे भामट्यांकडून सांगितले जात होते. त्यानुसार काहींना मोबाईलवर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्कॅन स्वाक्षरीने फेक नियुक्तीपत्र धाडली. 'ज्यावर जिल्हा आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन' असा उल्लेख होता. संशय आल्यानंतर काही उमेदवारांनी थेट आरोग्य विभागाशी संपर्क केला. त्यानंतर हा भांडाफोड झाला. 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके यांनी का सर्व प्रकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना सांगितला. गांभीर्य ओळखून गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.त्यानुसार रात्री उशिरा डीपीएम गरड यांनी आनंद नगर पोलीस ठाण्यात फिर्यात दाखल केली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध कलम ४६५, ४६८ आणि ४६९ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारी