शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जाळल्याच्या घटनेवर 'व्हॉट्सअॅप' वर चॅटींग करणे पडले महागात; चार तरुणांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:56 IST

दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या विषयावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे अन् त्याला अंगठा दाखूवन सहमती दर्शविणे चार तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.

ठळक मुद्देउमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील काही तरुणांनी त्रिकोळीकर नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे़ या ग्रुपवर संपत बिराजदार याने रविवारी सकाळी संविधान जाळण्यात आल्याच्या विषयावर आक्षेपार्ह टिप्पणी केली़

उमरगा (उस्मानाबाद) : दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या विषयावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे अन् त्याला अंगठा दाखूवन सहमती दर्शविणे चार तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील त्रिकोळी येथील या चार तरुणांवर आज उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील काही तरुणांनी त्रिकोळीकर नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे़ या ग्रुपवर संपत बिराजदार याने रविवारी सकाळी संविधान जाळण्यात आल्याच्या विषयावर आक्षेपार्ह टिप्पणी केली़ त्यास केदार बाळू जाधव, किसन माधव कुन्हाळे यांनी अंगठा दाखवत सहमती दर्शविली़ तर धीरज हासुरे यानेही बिराजदार याच्या पोस्टचे समर्थन करीत टाळी वाजविल्याचे चिन्ह पोस्ट केले.

ही चॅटिंग निदर्शनास आल्यानंतर त्रिकोळी येथीलच शशिकांत नागनाथ सुरवसे या तरुणाने रविवारी रात्री उमरगा ठाणे गाठून चारही जणांविरुद्ध तक्रार दिली. या प्रकाराची शहानिशा करुन पोलिस निरीक्षक माधव गुंडिले यांच्या सूचनेनुसार प्रिव्हेन्शन आॅफ इन्सल्ट टू नॅशनल आॅनर अ‍ॅक्ट १९७१ नुसार भादंविच्या कलम ५०५ (२), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संपत बिराजदार व केदार जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

राष्ट्राभिमानाच्या प्रतिकांचा अवमाऩ़़‘प्रिव्हेन्शन आॅफ इन्सल्ट टू नॅशनल आॅनर अ‍ॅक्ट १९७१’ या कायद्यात राष्ट्राभिमानाच्या प्रतिकांचा अवमान करण्याबद्दलच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे़ राष्ट्रध्वज व संविधान ही राष्ट्राभिमानाची प्रतिके आहेत़ याशिवाय, राष्ट्रगीत गातानाही कोणी अडथळा आणत असेल वा रोखत असेल तर त्यालाही शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद कायद्यात आहे़ या तरतुदीनुसार आरोपीस तीन वर्षांपर्यंत कैद किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा करता येऊ शकतात़ असाच गुन्हा संबंधित आरोपींनी दुसऱ्यांदा केल्यास कैदेची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे, जी एक वर्षापेक्षा कमी नसेल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपArrestअटकUsmanabad policeउस्मानाबाद पोलीस