दिलेल्या निवेदनावर म्हटले आहे, शहरात नवीन होणाऱ्या अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी अतिक्रमण-विरोधी पथकाची स्थापना करावी, अशी मागणी केली होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे शहरात अतिक्रमण हटवूनही पुन्हा अतिक्रमण होत आहे. परिणामी, रस्त्यावरून गाड्या चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तर फुटपाथवर अतिक्रमणे झाल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे टोळक्याने ठाण मांडून बसत आहेत. रस्त्यावर ट्रफिक जाम होत आहे. शिवाय, वराह, श्वानाचा मुक्त संचार असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नगर परिषदेने मोकाट जनावरांना कोंडवाड्यात घालावे, पशुवैद्यकीय खात्याच्या साहाय्याने श्वान व वराहांची नसबंदी करण्यात यावी, अतिक्रमणे हटवून कायमस्वरूपी अतिक्रमणविरोधी पथकाची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष एम.डी. देशमुख, उपाध्यक्ष मुकेश नायगावकर, गणेश वाघमारे, धर्मवीर कदम, र.बा. बाराते. एस. आर. नागमोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शहरातील अतिक्रमण हटवा, मोकाट श्वान, वराहाचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:40 IST