शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 11:59 IST

ही नवीन शुल्कवाढ २० सप्टेंबर २०२५ ते ०८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे.

तुळजापूर: शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने देणगी दर्शन पासच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. भाविकांना आता दर्शनासाठी दुप्पट शुल्क मोजावे लागणार आहे, तर दुसरीकडे जास्तीत जास्त भाविकांना अभिषेक करता यावा यासाठी अभिषेकाच्या संख्येत शंभरने वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात मंदिर प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

वाढीव शुल्क असे असेल: देणगी दर्शन पास: २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आला आहे.व्हीआयपी देणगी दर्शन पास: ५०० रुपयांवरून १,००० रुपये करण्यात आला आहे.स्पेशल गेस्ट पास: २०० रुपयांवरून ५०० रुपये पर्यंत करण्यात आलेला आहे.

ही नवीन शुल्कवाढ २० सप्टेंबर २०२५ ते ०८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीपत्रकावर मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांची स्वाक्षरी आहे.

अभिषेक करण्याची संधी वाढलीदेणगी शुल्कात वाढ झाली असली तरी, भाविकांना दिलासा देणारी एक चांगली बातमी आहे. सकाळच्या अभिषेकाची संख्या ३०० वरून ४०० करण्यात आली आहे. त्यामुळे आता दररोज १०० अधिक भाविकांना श्री तुळजाभवानी देवीचा अभिषेक करता येणार आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना या सोहळ्यात सहभागी होता येईल.

तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाचे असे आहे वेळापत्रकश्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सायंकाळी मंचकी निद्रेने सुरुवात होईल. पुढील नऊ दिवस देवीची निद्रा सुरू राहील. २२ सप्टेंबर रोजी पहाटे निद्रा संपुष्टात येऊन दुपारी १२ वाजता विधिवत घटस्थापना होईल. यानंतर २३, २४ व २५ रोजी नित्योपचार पूजा व रात्री छबिना मिरवणूक निघणार आहे. २६ रोजी ललित पंचमीनिमित्त देवीची रथालंकार पूजा बांधण्यात येणार आहे. २७ सप्टेंबर रोजी मुरली अलंकार, २८ रोजी शेषशाही, तर २९ रोजी भवानी तलवार अलंकार पूजा बांधण्यात येईल. ३० रोजी दुर्गाष्टमीनिमित्त महिषासूर मर्दिनी अलंकार पूजा होईल.

टॅग्स :dharashivधाराशिवspiritualअध्यात्मिक