शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूरच्या नगराध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र; यात्रा अनुदान अपहार प्रकरणात होत्या फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 15:46 IST

तुळजापूर पालिकेच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे या दीर्घकाळ गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी अपात्रतेची कारवाई केली आहे़

ठळक मुद्दे यात्रा अनुदान अपहार व घरकुल अपहारात गंगणे या आरोपी आहेत़, तसेच याच प्रकरणात त्या दीर्घकाळ फरार होत्या़

उस्मानाबाद : तुळजापूर पालिकेच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे या दीर्घकाळ गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी अपात्रतेची कारवाई केली आहे़ यात्रा अनुदान अपहार व घरकुल अपहारात गंगणे या आरोपी आहेत़ याच प्रकरणात त्या दीर्घकाळ फरार होत्या़

तुळजापूर नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे या त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे दीर्घकाळ पालिकेत गैरहजर असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी १६ जून २०१७ रोजी केली होती़ या गुन्ह्यांमध्ये काही नगरसेवक व अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल असल्याने पालिकाच बरखास्त करुन त्यावर प्रशासक नेमण्याची मागणी माने यांनी तक्रारीत केली होती़ या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी डॉ़राधाकृष्ण गमे यांनी हे प्रकरण ४ सप्टेंबर २०१७ रोजी सुनावणीसाठी घेतले़ दरम्यानच्या काळात  सुनावणीच्या बारा तारखा झाल्या.

अर्जदाराचा युक्तीवाद, प्रकरणातील साक्षीदारांच्या साक्षी व समोर आलेले पुरावे ग्राह्य धरुन जिल्हाधिकारी गमे यांनी गुरुवारी नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५६(३) नुसार अपात्रतेची कार्यवाही केली़ समोर आलेल्या साक्षी तसेच कागदपत्रांच्या पुराव्यात नगराध्यक्षा या १९ मार्च २०१७ ते १२ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत गैरहजर राहिल्याचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात ठेवला आहे़ या आदेशामुळे गुरुवारपासूनच तुळजापूर पालिकेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे़

साक्षीदारांवरही ताशेरेया प्रकरणात नगराध्यक्षा अर्चना गंगणे या पालिकेत हजर असल्याचे सांगणाऱ्या साक्षीदारांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी ताशेरे ओढले आहेत़ अजामीनपात्र गुन्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४३ नुसार सामान्य व्यक्तीसही आरोपीला अटक करता येऊ शकते किंवा तशी माहिती पोलिसांना देणे आवश्यक असते़ मात्र, गंगणे यांच्यावर असे गुन्हे दाखल असतानाही संबंधित साक्षीदारांनी या कलमाचे अनुपालन न केल्याबद्दल ताशेरे ओढण्यात आले. 

काय आहे प्रकरण?तुळजापुरात राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत २ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांच्यासह तत्कालीन अधिकाऱ्यांवरही १९ मार्च २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला होता़ तसेच तुळजाभवानी मातेच्या नवरात्रौत्सवासाठी राज्य शासनाकडून मिळालेल्या यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा नगराध्यक्षा अर्चना गंगणे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे, लेखापाल अविनाश राऊत यांच्यासह नगरसेवक, ठेकेदार अशा १९ जणांवर २८ मार्च २०१७ रोजी दाखल आहे़  

टॅग्स :Usmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादnagaradhyakshaनगराध्यक्षCorruptionभ्रष्टाचार