लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : तालुक्यातील नागूर येथील टायगर ग्रुपचे अध्यक्ष अक्षय पवार आणि न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे संस्थापक तथा प्राचार्य शहाजी जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना संगणक संचाचे वाटप करण्यात आले.
यावेळी स्कूलतर्फे अक्षय पवार यांना भारतमातेची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अक्षय पवार म्हणाले, कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शासनाने ‘शाळा बंद व शिक्षण सुरू’ हा उपक्रम राबवला आहे. ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी आणि स्वाध्याय सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे एक तरी मोबाईल किंवा संगणक असणे गरजेचे आहे. यासाठी टायगर ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविल्याचे सांगितले. यावेळी अक्षय पवार, शहाजी जाधव, संतोष जाधव, सलीम मुल्ला, अजय पवार, रमेश वाघुले, सुरज झिंगाडे, बळीराम कोकणे आणि लाभार्थी विद्यार्थी प्रणिता वाघुले, गौरी झिंगाडे, संस्कृती जाधव, अनुज बिराजदार, साक्षी कोकणे यांच्यासह अन्य विद्यार्थी उपस्थित होते.