शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा; 'धाराशिव' नावासाठी मनसे मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 19:32 IST

MNS on field for the name 'Dharashiv' for Usmanabad मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या.

ठळक मुद्देस्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर व्हावे, असे १९८८ साली जाहीर केले होते. ज्या स्वप्नासाठी सरकार स्थापन झाले, ते त्यांनी पूर्ण केलेच पाहिजे, असा आग्रह मनसेने धरला आहे. 

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराच्या नामांतरावर बसलेली धूळ यावेळी मनसेने उडविली आहे. सोमवारी त्यांनी या संदर्भात निवेदन देऊन तातडीने ही नामांतर प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला व सरकार स्थापन केले. मग त्यांनी बाळासाहेबांचे नामांतर विषयीचे स्वप्न पूर्ण केलेच पाहिजे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर व्हावे, असे १९८८ साली जाहीर केले होते. त्यांचे हे स्वप्न होते, त्यांची ती भावना होती. मग ज्या स्वप्नासाठी सरकार स्थापन झाले, ते त्यांनी पूर्ण केलेच पाहिजे, असा आग्रह मनसेने धरला आहे. 

उस्मानाबाद हे नाव शेवटचा निजाम राजा मीर उस्मान अली याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. राज्यात शिवसेना सरकारमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने नामांतर करावे, अशी मागणीही मनसेने केली आहे. यावेळी उस्मानाबाद शहराध्यक्ष संजय पवार, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल महाजन, उमेश कांबळे, सौरभ देशमुख, अक्षय सावळे, वेदकुमार पेंदे, रामभाऊ मोटे, नितेश कोकाटे व पदाधिकारी उपस्थित होते.

१९९५ साली प्रक्रिया१९०५ साली नळदुर्गहून जिल्हा मुख्यालय धाराशिवला हलविल्यानंतर हे नामकरण झाले आहे. त्यामुळे आता बदल करणे आवश्यक आहे, असे मनसेने नमूद केले आहे. दरम्यान, १९९५ साली युतीचे सरकार आल्यानंतर काही काळ याची प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र, नंतर ती थांबली. ती स्थिती अद्यापपर्यंत कायम आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMNSमनसे