शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चैत्र पौर्णिमेसाठी भाविकांचे जत्थे तुळजापुरात; दर्शनासाठी महाद्वार टाळा, घाटशीळ मार्ग निवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:46 IST

आज छबिना मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात

उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीचा नवरात्रीनंतर सर्वात मोठा समजला जाणारा चैत्री पोर्णिमेचा उत्सव शुक्रवारी रात्री छबिना मिरवणुकीने सुरू होत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील भाविकांचा ओघ तुळजापुरात सुरू झाला आहे. गुरुवारी दुपारपासून भाविकांचे जत्थे शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली.

तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी प्रतिदिन लाखाहून अधिक भाविक तुळजाभवानी चरणी नतमस्तक होत असतात. मागील दोन वर्षे मंदिर बंद राहिल्याने देवी भाविकांना या उत्सवाला मुकावे लागले होते. यावर्षी उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाल्याने भाविकांमध्येही उत्साह आहे. यावेळी नेहमीपेक्षा जास्त भाविक या उत्सवासाठी दाखल होण्याचा मंदिर संस्थानचा अंदाज आहे. या अनुषंगाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. उत्सव कालावधीत देवीचे दर्शन तसेच इतर विधीसाठी दूर अंतरावर असणारे भाविक आतापासूनच दाखल होऊ लागले आहेत. 

विशेषत: कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या भागातील भाविक गुरुवारपासूनच तुळजापुरात दाखल झाले आहेत. शिवाय, पंढरपूरच्या यात्रेचे भाविकही देवीच्या दर्शनासाठी आले आहेत. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण समजल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीला खेटे घालण्यासाठी लाखो भाविक याच कालावधीत येरमाळा येथे जात असतात. हे भाविकही तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. यामुळे तुळजापूर शहर गजबजण्यास सुरुवात झाली आहे.

भवानी कुंड केले खुले...चैत्र पौर्णिमा उत्सव कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सुविधांबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार भाविकांच्या सोयीसाठी भवानी कुंडाची साफसफाई करून ते गुरुवारपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले. हे कुंड नवरात्रीनंतर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. या कुंडात एकावेळी हजारावर भाविकांना थांबण्याची सोय आहे.

मोफत दर्शनासाठी केवळ घाटशीळ मार्ग...लाखो भाविकांची उत्सव काळात हजेरी लागत असल्याने मंदिराच्या महाद्वारात गोंधळ उडतो. भाविकांना थांबण्यासाठी येथे पुरेशी जागा नसल्याने मंदिर समितीची तारांबळ उडते, तसेच भाविकांनाही मोठ्या गैरसायीला सामारे जावे लागते. त्यामुळे मोफत दर्शन रांग ही महाद्वारातून बंद करण्यात आली आहे. या भाविकांना पास देण्याची व मंदिरात सोडण्याची सोय ही सोलापूर रस्त्याकडील घाटशीळ मार्गावरून करण्यात आली आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादspiritualअध्यात्मिक