शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

६२२ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे ‘प्लॅन प्लस’वर; निधी नियोजनात उस्मानाबाद जिल्हा राज्यात तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:06 IST

निधी याेग्य पद्धतीने खर्च व्हावा, त्यात पारदर्शकता यावी यासाठी ग्रामपंचायतींना विकासकामांचे आराखडे करण्याचे निर्देश दिले हाेते.

ठळक मुद्देउस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात अव्वल, राज्यात तिसराआठही तालुक्यांना या कामामध्ये पहिली रॅंक मिळाली आहे.

उस्मानाबाद : पंधराव्या वित्त आयाेगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना माेठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध हाेताे. कामांचे नियाेजन करून निधी खर्च झाल्यास गावांचा सर्वांगीण विकास हाेण्यास मदत हाेते. हीच बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतींना विकासकामांचे वर्षभराचे नियाेजन करण्याचे फर्मान शासनाने काढले हाेते. हे नियाेजन ‘प्लॅन प्लस’ या आज्ञावलीवर अपलाेड करणे बंधनकारक हाेते. त्यासाठी १५ मार्चची डेडलाईन दिली हाेती. त्यानुसार मुदतीत काम पूर्ण करत जिल्ह्यातील सर्व ६२२ ग्रामपंचायतींनी विकास आराखडे ऑनलाईन केले आहेत. त्यामध्ये उस्मानाबाद मराठवाड्यात अव्वल तर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विकासकामांना गती यावी, आर्थिक गैरप्रकार कमी व्हावेत, यासाठी शासनाकडून थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर निधी दिला जात आहे. हा निधी याेग्य पद्धतीने खर्च व्हावा, त्यात पारदर्शकता यावी यासाठी ग्रामपंचायतींना विकासकामांचे आराखडे करण्याचे निर्देश दिले हाेते. हे आराखडे ऑनलाईन करण्यासाठी ‘प्लॅन प्लस’ ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. यावर हे सर्व आरखडे अपलाेड करण्यासाठी ग्रामपंचायतींना १५ मार्चची डेडलाईन देण्यात आली हाेती. हे काम मुदतीत पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून वेळाेवेळी बैठका घेतल्या. गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांना मार्गदर्शन करून कामाला गती दिली. त्यामुळे जिल्हाभरातील ६२२ ग्रामपंचायतींची माहिती मुदतीच्या आत ‘प्लॅन प्लस’वर अपलाेड झाली आहे. यात उस्मानाबादने मराठववाड्यातून अव्वल क्रमांक पटकाविला आहे, तर राज्यातून तृतीय. उस्मानाबादनंतर मराठवाड्यातीलच हिंगाेलीचा क्रमांक लागताे.

पहिल्या रॅंकमध्ये सर्वच तालुके...‘प्लॅन प्लस’ या आज्ञावलीमध्ये विकास आराखडे अपलाेड करण्यामध्ये जिलह्यातील सर्वच तालुक्यांनी झेप घेतली आहे. आठही तालुक्यांना या कामामध्ये पहिली रॅंक मिळाली आहे. यामध्ये भूम तालुक्यातील ७४, तुळजापूर १०८, लाेहारा ४४, वाशी ४२, उमरगा ८०, उस्मानाबाद १११, कळंब ९१ आणि परंडा तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

‘प्लॅन प्लस’ या आज्ञावलीमध्ये विकासकामांचे आराखडे मुदतीत अपलाेड व्हावेत, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळाेवेळी बैठका घेण्यात आल्या. या माध्यमातून कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले हाेते. आपण हे काम मुदतीत पूर्ण केले आहे.-नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादfundsनिधीgram panchayatग्राम पंचायत