शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक विभागाकडे तक्रार; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:52 IST

एसडीएमने केली डीएमची तक्रार, निवडणूक आयोगाकडून तपासणीस सुरुवात

धाराशिव : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्याशी असभ्य भाषेत बोलून संसाधने देताना दुजाभाव केल्याची तक्रार उपजिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तथ्य तपासणीसाठी गुरुवारी विभागीय अपर आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली होती. या प्रकरणातील तपशिलाबाबत मात्र त्यांनी मौन राखले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजयकुमार ढवळे यांनी निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या तक्रारीचा लेटरबॉम्ब टाकला होता. १८ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून त्यांनी निवडणूक संसाधने देताना इतर मतदारसंघांच्या तुलनेत तुळजापूरबाबत दुजाभाव केल्याचा आरोप केला होता. निवडणूक सामग्री वितरित करण्यासाठी आवश्यक मंडपासाठी इतर मतदारसंघांना २३ ते २५ लाख रुपये मंजूर केले. मात्र, तुळजापूरसाठी केवळ ९ लाख ९० हजार रुपये मंजूर केले. इव्हीएम, व्हीव्हीपॅट वाहतुकीसाठी कमी रक्कम दिली. वाहने कमी पुरवली, अशा तक्रारी ढवळे यांनी केल्या होत्या. तसेच निवडणूक कर्तव्यात कसूर करीत असलेल्या एका लेखाधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविल्याने जिल्हाधिकारी आपल्याशी असभ्य भाषेत बोलले. चौकशा लावणे, नोटिसा देणे, करिअर संपवण्याची धमकी देणे, गुलामासारखे वागवणे, बैठकीतून हाकलून लावणे, असे प्रकार जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

दरम्यान, २९ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा हीच तक्रार आकडेवारी व इतर तपशील जोडून केली होती. याअनुषंगाने निवडणूक आयोगाने तक्रारींतील तथ्य तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय अपर आयुक्त बेलदार यांची नियुक्ती केली होती. गुरुवारी बेलदार यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावून तक्रारींच्या मुद्यांवर माहिती जाणून घेतली. यानंतर ते आपला अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार असल्याचे समजते.

उपजिल्हाधिकाऱ्यांचे निलंबनया प्रकरणातील तक्रारदार उपजिल्हाधिकारी ढवळे यांना दोन दिवसांपूर्वीच शासनाने निलंबित केले आहे. कर्तव्यात त्रुटी ठेवून त्यासंबंधीचे खुलासेही केले नसल्याचा एक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे काही महिन्यांपूर्वी पाठविला होता. त्याआधारे ढवळे यांचे निलंबन झाले आहे. यापाठोपाठ लागलीच जिल्हाधिकारी प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे.

आरोप कपोलकल्पित : जिल्हाधिकारीआपल्यावर करण्यात आलेले आरोप हे कपोलकल्पित आहेत. आपण याविषयी महिनाभरापूर्वीच आयोगाकडे म्हणणे सादर केले आहे. तक्रारींमध्ये कसलेही तथ्य नाही. सुनावणीवेळीही आपले म्हणणे मांडले आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.

टॅग्स :dharashivधाराशिवcollectorजिल्हाधिकारीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग