कुराण हा ईश्वरीय ग्रंथ असून, तो समस्त मानव जातीत प्रेम, सद्भावना, मानवता निर्माण करणारा आहे. यामुळे त्यात कुठल्याही प्रकारचा फेरबदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. असे असताना उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डचा माजी अध्यक्ष वसीम रिजवी याने कुराणमधील २६ आयतींना काढून टाकण्याची जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली. यामुळे ईश्वरीय धर्मग्रंथाचा अवमान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावर मसूद शेख, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मौलाना इम्रान मुस्तफखान, उपाध्यक्ष मुक्ती रहमतुल्ला, शेख आयाज हारुन, जनरल सेक्रेटरी जहिरोद्दीन नसिरोद्दीन काझी, शेख अलिमोद्दीन जियाउद्दिन, अफरोज बशीर पिरजादे, कोषाध्यक्ष आरेफ अ. खालीक शेख, शहराध्यक्ष ताहेर रफिक शेख, उपाध्यक्ष हा. सनाउल्ला कलीमउला, हा. शेरखॉं शमशीर खान, अ. खुद्दुस फाजील मोमीन, असकर अली निजाम अली, बाबा फैजोद्दीन शेख, हा. मुदस्सी अ. रहीम मोमीन व मौलाना कासमी आदींच्या सह्या आहेत.