शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

तेलही गेले अन् तूपही गेले; वाटणीपूर्वीच गुन्हे शाखेने रेड टाकत चोरीचा मुद्देमाल केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 19:10 IST

crime news in Usamanabad मोठी कामगिरी फत्ते करुन चैनीची झोप घेणारा मोहन आता जेलची हवा खात आहे.

ठळक मुद्देसराफ दुकान फोडणारा गजाआड६ लाखांचा ऐवज जप्त

उस्मानाबाद : अख्खं उन्हं अंगावर घेत दिवसभर टेहाळणी केली... एका सराफाचे दुकान हेरले... रात्र जागून तिघांनी सोमवारी पहाटे धाडसाने हे दुकान फोडले... लाखो रुपयांची सोने-चांदी पळविली... दोन दिवसांनी वाटणी करण्याचे निश्चित करुन तो सुखाची झोप घेत होता. पण, हाय रे दुर्दैव. वाटणीपूर्वीच पोलीस पोहोचले अन् तेलही गेले व तूपही. हा प्रकार जळकोट येथील चोरी प्रकरणातून समोर आला आहे.

मूळचा यमगरवाडी येथील मोहन नागनाथ शिंदे व त्याचे बार्शी तालुक्यातील साथीदार सूरज्या शिंदे व बापू काळे हे तिघेही सध्या हंगरगा पाटी येथील पारधी पेढीवर वास्तव्यास होते. चोऱ्यांचा उद्योग त्यांनी सुरु केलेला. रविवारी दिवसभर या तिघांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील बाजारपेठेत एकाच दुचाकीवरुन फेरफटका मारला. तेव्हा त्यांच्या नजरेत श्रीपाद ज्वेलर्स हे दुकान भरले. सायंकाळी एका शेतात मुक्काम ठोकून पहाटे जळकोटला रवाना व्हायचे व दुकान फोडायचे त्यांनी निश्चित केले. ठरल्याप्रमाणे सोमवारी पहाटे ते जळकोटात गेले. हेरलेले दुकान गाठून त्याचे कुलूप तोडले. मोहन हा बाहेर रखवालीसाठी थांबला. तर सूरज्या व बापू आत शिरले. त्यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड काही मिनिटातच साफ केली.

यानंतर तेथून पळ काढत पहाटे ५ वाजता हंगरगा पाटी गाठली. येथे सूरज्या व बापू यांनी काही रक्कम व सोने घेऊन नंतर वाटणी करु, असे सांगत काढता पाय घेतला. मोहनने मग ६ किलो ८०० ग्रॅम चांदी, ४० ग्रॅम सोन्याचे दागिने व २५ हजार रोख ही घरातील दिवाणाखाली लपवून ठेवली. या घटनेनंतर गुन्हे शाखा चोरट्यांच्या मागावर होतीच. त्यांना खबरही लागली. ही चोरी मोहन व त्याच्या दोन साथीदारांनी केल्याचे कळले. यानंतर पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व त्यांच्या पथकाने तातडीने हंगरगा पाटी गाठून मोहनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त केला. आता पोलीस इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मोठी कामगिरी फत्ते करुन चैनीची झोप घेणारा मोहन आता जेलची हवा खात आहे.

धाडस दाखविले अन् चोरटा सापडला...जळकोट येथील ज्वेलरी फोडल्यानंतर अवघ्या एका दिवसातच गुन्हे शाखेला चोरट्यांची खबर लागली. मात्र, आरोपी पारधी वस्तीवर असल्याने जेमतेम कर्मचार्यांच्या जीवावर त्याला पकडणे जोखमीचे होते. तरीही धाडस करुन निरीक्षक घाडगे, उपनिरीक्षक भुजबळ, कर्मचारी सय्यद, चव्हाण, मरलापल्ले, आरसेवाड, महिला कर्मचारी होळकर यांच्या पथकाने वस्ती गाठली व आरोपी मोहनला मुद्देमालासह ताब्यात घेतले. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर अधीक्षक संदीप पालवे यांनी गुन्हे शाखेचे कौतुक केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद