शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

coronavirus : गुढीवर कोरोनाची वक्र दृष्टी; शंभो महादेव मंदिरातील शेकडो वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:17 IST

शंभो महादेवाच्या मंदीराला ही संचारबंदी लागू झाल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे. 

ठळक मुद्देगावात उभारली जातेय एकच गुढी

- बालाजी बिराजदार लोहारा (जि.उस्मानाबाद) : शेकडो वर्षापासून तालुक्यातील भातागळी गावात चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याला संपूर्ण गावातर्फे एकच गुढी म्हणजे महादेवाची काठी महादेव मंदीरात उभारली जाते. शंभु महादेवाची अर्धागिनी असलेल्या पार्वतीचा अवतार समजून काटीची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्यात येते. पण या परंपरेला प्रथम कोरोनामुळे खंड पडला आहे. त्यात शंभो महादेवाच्या मंदीराला ही संचारबंदी लागू झाल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे.            

तेरणा नदीच्या काठावर वसलेले लोहारा तालुक्यातील भातागळी हे गाव गावात दर वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी गावात कोणाच्याच घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा नाही. गावची गुढी एकच ती म्हणजे शंभो महादेवाची काठी उभारली जाते. ही काठी सायंकाळी सहाच्या सुमारास उभारण्यात येते. व या गावातील भक्त गुढी पाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी  शकडो भक्तमंडळी या महादेवाच्या काठीबरोबर पायी चालच ही शंभो महादेवाची काठी घेवून शिखर शिंगणापूरला जातात. साधारण भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर २५० किमीचे आहे. दररोज ४० किमीचा पायी प्रवास करत भक्त हे अंतर सहा दिवसात पूर्ण करतात. ही काठी भातागळी, लोहारा, उस्मनाबाद, सोलापुर, पुणे,सातारा जिल्ह्यातून शिंगणापूर जातात. ही काठी शिखर शिंगणापूरात मानाची काठी आहे. ही काठी परत भातागळी गावात आल्यानंतर गुढी पाडव्यानंतर येणाऱ्या पोर्णिमेला येते. या दिवशी काठीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव व परीसरातील भक्त मोठ्यासंख्येने हजेरी लावतात. यात महीला भक्तांची संख्या लक्षणीय असते. या दिवशी पासून मोठी यात्रा भरते ही यात्रा तीन दिवस असते.

या यात्रेसाठी जे गावातील नागरीक काम धंद्यासाठी, नोकरीला बाहेर गावी गेले आहेत. ते गावाकडे येतात.नवस बोललेले भाविक या यात्रे दरम्यान नवस फेडतात. परीसरातील भाविक ही मोठ्याप्रमाणात यात्रेस येतात. पण शेकडो वर्षाच्या इतिहासात प्रथमच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व धार्मिक,यात्रा यासह आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे भातागळी गावात गुढी पाडव्याला संपुर्ण गावात एकच गुढी उभारली जाते. ती आज उभारली गेली नाही. त्यात मंदीराला संचारबंदी लागल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक जण घरातच पुजाआर्चा करत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद