शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : पोलीस पाहताच वस्तऱ्यासह नाव्हीदादाने ठोकली धूम; ग्राहकही पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 11:34 IST

बंदी असतानाही एका वस्तीवर खुल्या जागेत थाटले होते दुकान...

ठळक मुद्देएका सजग नागरिकाने केली पोलिसात तक्रारपोलीस आले रे ,म्हणताच काढला पळ

- देवीसिंग राजपूत  

येणेगूर (जि. उस्मानाबाद) :  पोलीस आले रे...पळा..पळा...अशी आरोळी कानी पडताच भिंतीच्या आडोशाला दुकान थाटलेले नाव्हीदादा हातातील वस्तºयासह तर खुर्चीतील ग्राहकाने अर्धवट दाढी अन् गळ्यातील पांढऱ्या कपड्यासह बाजुच्या शेतात धूम ठोकली. वेटिंगमध्ये थांबलेल्या आठ-दहा लोकांनीही मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. चिंचेच्या झाडाखाली थांबलेले काही तरूणही पोलिशी दंडुक्याच्या भितीने दिसेल त्या मार्गाने पळत सुटले.

उमरगा तालुक्यातील येणेगूर गावातील मायनाळे वस्तीवरील ही घटना़ लॉकडाऊनमुळे गावातीलच एका नाव्ह्याने वस्तीतील एका घराच्या भिंतीचा आडोसा पाहून खुल्या जागेत केशकर्तनालय सुरू केले. नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी नाव्ही वस्तीवर आले असता दहा ते बारा ग्राहक वाट पहात थांबले होते. सुरूवातीला एक-दोन ग्राहकांची हजामत झाल्यानंतर वेटिंगमधील तिसरा खुर्चीत जाऊन बसला. त्याची हजामत अर्धी उरकली होती. 

याचवेळी वस्तीतील एका सजग व्यक्तीने फोन करून पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला. थोडाही विलंब न लावता येणेगूर दूरक्षेत्रचे पोना दिगंबर सूर्यवंशी वस्तीवर दाखल झाले. खुल्या जागेतील केशकर्तनालयापासून काही अंतरावर ते असतानाच ‘‘पोलीस आले रे’’, अशी आरोळी काहींनी ठोकली अन् नाव्हीदादा दचकले. पोलीस नजरेस पडताच बाजुलाच असलेल्या शेतात खुर्चीतील ग्राहकाच्या अगोदर धूम ठोकली. नाव्हीदादा साहित्य जागेवर सोडून पळाल्याचे पाहून अर्धवट दाढी अन् गळ्यात बांधलेला कपडा घेऊन नाव्हीदादाच्या मागे पळ काढला. वेटिंगमध्ये थांबलेले आठ-दहा जणही मिळेल त्या मार्गाने पळून गेले. नाव्हीदादा का पळताहेत हे उमगलेले नसतानाही दंडुक्याच्या भितीने चिंचेच्या झाडाखाली थांबलेले दहा-बारा तरूणही गावातील गल्लीबोळाने पसार झाले. सदरील गोंधळाची गुरूवारी दिवसभर येणेगुरात चर्चा सुरू होती. दरम्यान, ‘ते’ नाव्ही कोण? याचा शोध आता येणेगूर दूरक्षेत्रच्या पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद