शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीसाठी घेतले ४ हजार, पालिका कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 17:15 IST

corona virus : उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देनगरपालिकेच्यावतीने कोरोना बाधित रुग्णांचा विनामूल्य अंत्यविधी करण्यात येतो. नातेवाईकांकडे अंत्यविधी करण्यासाठी नगरपालिका सफाई कामगाराने ४ हजार रुपये घेतले

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीसाठी नगरपालिका सफाई कामगारांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडून ४ हजार रुपये घेतल्याचा प्रकार शुक्रवारी तुळजापुरात उघडकीस आला. या प्रकाराची तातडीने चौकशी करून मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित केले.

उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला होता. नगरपालिकेच्यावतीने कोरोना बाधित रुग्णांचा विनामूल्य अंत्यविधी करण्यात येतो. मात्र, तुळजापूर येथे बामणी येथील त्या मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडे अंत्यविधी करण्यासाठी नगरपालिका सफाई कामगार शंकर राजेंद्र कांबळे याने ४ हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारली होती. याचवेळी नातेवाईकांनी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा मुख्याधिकारी लोकरे यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठून संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांना समोरा-समोर घेऊन चौकशी केली. तेव्हा सफाई कामगार शंकर कांबळे याने ४ हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मुख्याधिकारी लोकरे यांनी ही रक्कम त्या नातेवाईकाला परत करून सफाई कामगारावर निलंबनाची कारवाई केली.

रक्कम नातेवाईकांना परतशुक्रवारी कर्मचाऱ्याने अंत्यविधीसाठी पैसे घेतल्याचा फोन आल्यानंतर स्वतः उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कर्मचारी आणि नातेवाईक यांना समोरा-समोर घेऊन चौकशी केली. तेव्हा कर्मचाऱ्याने चार हजार रुपये घेतल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम त्या नातेवाईकांना परत करून कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.-आशिष लोकरे, मुख्याधिकारी, तुळजापूर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद