उस्मानाबाद : मागील साडेतीन महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या घटू लागली आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग पूर्णतः टळलेला नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी १२ केंद्रावर कोव्हॅक्सिन तर ११ केंद्रावर कोविशिल्ड लस उपलब्ध करुन दिली आहे. या केंद्रावर १८ वर्षांपुढील व्यक्तीस पहिला व दुसरा डोस मिळेल.
जून महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. प्रतिदिन ४० ते ६० च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका टळलेला नसल्याने आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम राबविण्यावर भर दिला आहे. नागरिकही पुढे येत लस घेत आहेत. गुरुवारी १२ केंद्रावर कोव्हॅक्सिन व ११ केंद्रावर कोविशिल्ड लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या केंद्रावर १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती यांना प्राधान्याने लस घेता येणार आहे.
या केंद्रांवर कोव्हॅक्सिन
मुरुम, वाशी, लोहारा, सास्तूर, भूम, तेर ग्रामीण रुग्णालय, उमरगा, परंडा, तुळजापूर, कळंब उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या केंद्रावर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांनी दुसरा डोस घ्यावा.
येथे मिळणार कोविशिल्ड
उमरगा येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्रशाला, मुरुम येथील जि.प. विशेष शाळा, कळंब येथील फुले-आंबेडकर वाचनालय, जुने पोस्ट ऑफिस चोंदे गल्ली, तुळजापूर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक ३, परंडा येथील सिद्वीवाल कॉम्प्लेक्स, डॉ. गायकवाड हॉस्पिटल, लोहारा येथील किंग कोब्रा गणेश मंडळ, वाशी येथील शिवशक्ती नगरमधील जि.प. प्रा. शाळा, भूम येथील रवींद्र हायस्कूल या केंद्रांवर कोविशिल्डची लस मिळेल.