जून महिन्यापासून प्रतिदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत चालली आहे. मात्र, कोरोनाचा धाेका टळला नाही. तसेच येत्या काही दिवसांत तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे मास्क, फिजिकल डिस्टन्स, हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. शिवाय, कोरोनापासून बचाव व्हावा, याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमही राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी १२ केंद्रांवर कोविशिल्ड व १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना लस घेता येईल.
येथे मिळणार कोव्हॅक्सिन
मुरुम, लोहारा, सास्तू, भूम, वाशी, तेर ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, परंडा, कळंब उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असेल.
या ठिकाणी मिळेल कोविशिल्ड
उमरगा येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्रशाला, कळंब येथील फुले-आंबेडकर वाचनालय, जुनी सराफ लाइन भागातील विठ्ठल मंदिर, तुळजापूर येथील जिजामातानगरातील सभागृह, परंडा येथील सिद्धीवाल कॉम्प्लेक्स, डॉ. गायकवाड हॉस्पिटल, लोहारा येथील भारतमाता मंदिर, वाशी येथील शिवशक्तीनगरातील जि.प. प्रा. शाळा, भूम येथील इंदिरानगर भागातील जि.प. शाळा, मुरूम येथील जि.प. कन्या प्रशाला, उस्मानाबाद येथील पोलीस हॉस्पिटल या ठिकाणी कोविशिल्ड लस मिळेल.