शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

पाच महिन्यांपूर्वी मंजुरी मिळालेल्या वीज उपकेंद्र उभारणीला मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 14:25 IST

फुलवाडी उपकेंद्रावरील अतिरिक्त भार लक्षात घेऊन जवळपास पाच महिन्यांपूर्वी पुजारी तांडा येथे नवीन स्वतंत्र उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देअतिरिक्त भारामुळे फुलवाडी केंद्रातील वीजपुरवठ्यात व्यत्ययनव्याने मंजूर झालेल्या उपकेंद्राचे काम लातूरच्या पथकाकडे आहे.

अणदूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील फुलवाडी वीज उपकेंद्रावर भार वाढल्याने वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. यामुळे पुजारी तांडा येथे नवीन वीज उपकेंद्रास जवळपास पाच महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली. परंतु, या उपकेंद्राच्या उभारणीबाबत पुढील कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने हा प्रश्न रखडला आहे.

अणदूर विभागातील फुलवाडी उपकेंद्राची क्षमता पाच एमव्हीए आहे. या उपकेंद्रांतर्गत फुलवाडी, अणदूर, उमरगा, चिवरी, खुदावाडी या गावांना विद्युतपुरवठा होत असतो. परंतु, यावर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्यामुळे परिसरातील १० ते १२ डीपी बंद करून विद्युतपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे. त्यामुळे शेतातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शिवाय, गावातील विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थांचीदेखील गैरसोय होत आहे. फुलवाडी उपकेंद्रावरील अतिरिक्त भार लक्षात घेऊन जवळपास पाच महिन्यांपूर्वी पुजारी तांडा येथे नवीन स्वतंत्र उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली. या अनुषंगाने महावितरणने जागादेखील ताब्यात घेतली. परंतु, पुढे याची कार्यवाही ठप्प झाली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन हे उपकेंद्र त्वरित उभे करावे, अशी मागणी होत आहे.

अभियंतापद रिक्तगेल्या चार-पाच महिन्यांपासून अणदूर येथील अभियंत्याचे पद रिक्त असून, येथील पदभार तुळजापूर येथील अभियंत्यांकडे देण्यात आला आहे. परंतु, त्यांना तेथील कामकाज पाहून अणदूरकडे लक्ष देणे कठीण होत आहे. परिणामी, ग्राहकांच्या वीजबिलाच्या अडचणी, वीजपुरवठ्यातील समस्या सुटत नसल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय, अणदूर, नळदुर्ग येथे वीजबिल भरणा केंद्र नाही. त्यामुळे बिल भरण्यासह कुठलाही बिघाड झाल्यास ग्रामस्थांना तुळजापूरला जावे लागते. त्यासाठी अणदूर येथील अभियंत्याचे पद कायमस्वरूपी भरण्याची गरज व्यक्त होत आहे.

लवकरच हे काम सुरू होईल

नव्याने मंजूर झालेल्या उपकेंद्राचे काम लातूरच्या पथकाकडे आहे. या उपकेंद्रासाठी पुजारी तांड्यावरील जागा ताब्यात घेऊन टेंडर ऑर्डरही फायनल झाली आहे. लवकरच हे काम सुरू होईल. अणदूर येथील अभियंतापद रिक्त असल्याने तुळजापूर येथील अभियंत्यांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. ग्राहकांना अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांची कागदपत्रे मागवून घेऊन तत्काळ कार्यवाही केली जात आहे. फक्त काही कामांना एखादा- दुसरा दिवस विलंब होत आहे. येथील पदही लवकरच भरून गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- एस.व्ही. गोदे, उपकार्यकारी अभियंता, तुळजापूर

टॅग्स :mahavitaranमहावितरणOsmanabadउस्मानाबादelectricityवीज