शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

स्तुत्य उपक्रम! धाराशिव जिल्ह्यातील झेडपी शाळांमध्ये आता ‘स्पाेकन इंग्लिश’ !

By बाबुराव चव्हाण | Updated: October 12, 2023 16:57 IST

जिल्हा परिषद व लिंक्स फाऊंडेशनमध्ये झाला सामंजस्य करार

धाराशिव : विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेतून संभाषण करण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, याकरिता आता धाराशिव जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पाेकन इंग्लिश’ हा उपक्रम राविण्यात येणार आहे. ओपन लिंक्स फाऊंडेशन आणि जिल्हा परिषदेत तसा सामंजस्य करारही झाला आहे.

एकीकडे इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. शहरांसाेबतच ग्रामीण भागातही वर्षागणिक जाळे विस्तारू लागले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीसंख्येवर हाेवू लागला आहे. खाजगी शाळांचे हे आक्रमण थाेपविण्यासाठी आता मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून ‘टॅग इंग्लिश’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामाध्यमातून प्रत्येक शाळेत आता ‘स्पाेकन इंग्लिश’ सुरू करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेने ओपन लिंक्स फाऊंडेशन साेबत सामंजस्य करारही केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अवघ्या २५ तासांमध्ये इंग्रजी बाेलण्याचा सराव आणि काैशल्य निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, जे शिक्षण या उपक्रमात झाेकून देत काम करतील, त्यांना प्रत्येक महिन्याकाठी बक्षिसेही दिली जाणार आहेत.

‘स्पाेकन इंग्लिश’ कशासाठी?जिल्हा परिषद शाळांमतील मुलांना २५ तासांमध्ये इंग्रजी बाेलण्याचा सराव व्हावा, त्याच्यातील इंग्रजी बाेलण्याची भीती दूर व्हावी, विद्यार्थ्यांना सहजरित्या स्वतःबद्दल इंग्रजी भाषेतून सांगता यावे, इंग्रजीच्या किमान ५०० शब्दांचा शब्दकाेष तयार व्हावा, विद्यार्थ्यांत इंग्रजी भाषेतून संभाषण करण्यासाठीचा आत्मविश्वास दृढ व्हावा हा या स्पाेकन इंग्लिश उपक्रम हाती घेण्यामागचा उद्देश आहे.

रिझल्ट द्या, बक्षिसे जिंका...शाळांमधील होणारे चांगले कार्य, तसेच मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणारे शिक्षक तसेच शाळांना प्राेत्साहन देण्यासाठी दरमहा बक्षीस वितरण समारंभ हाेणार आहे. जिल्हा पातळीवर तीन तर तालुका पातळीवर एक बक्षीस दिले जाणार आहे, असे ओपन लिंक्स फाऊंडेशनकडून सांगण्यात आले.

इंग्रजीची भिती घालविणे हा उद्देशधाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता स्पाेकन इंग्लिश हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भिती घालविणे हा, एकमेव उद्देश उपक्रम राबविण्यामागे आहे. उल्लेखनीय काम करणारे शिक्षक, शाळांच्या पाठीवर बक्षीसरूपी काैतुकाची थापही दिली जाणार आहे.-राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद, धाराशिव.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाOsmanabadउस्मानाबाद