अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सभापती दत्ता देवळकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष ॲड. दीपक आलुरे, तुळजापूर पं. स. सभापती रेणुका इंगोले, उपसभापती दत्तात्रय शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जि. प. सदस्य वसंतराव वडगावे, सरपंच राजश्री बागडे, पिंटू मुळे, उपसरपंच फिरोज मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी इटकळ येथील हनुमान मंदिर सभामंडप, नियोजित सिमेंट रस्ता कामाची सुरुवात करण्यात आली. तसेच संपूर्ण गावात बंदिस्त गटार, मुस्लिम समाजातील दर्गाहमध्ये सभागृह, भीमनगर येथे सभागृह, शाळेसाठी वर्गखोल्या, शौचालय, बसस्थानकाची सोय, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयांची इमारत उभी करणे, आदी मागण्या पाटील यांच्याकडे करण्यात आल्या. राहुल बागडे यांनी प्रास्ताविक केले. मल्लिनाथ जळकोटे यांनी सूत्रसंचालन केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद पाटील यांनी आभार मानले. यासाठी अमोल पाटील, नजीर शेख, सायबा क्षीरसागर, रंजना मुळे, पद्माबाई लकडे, सविता सोनटक्के, खातुनबी इनामदार यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला.