शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

छत्रपती संभाजीराजेंना मंदिरात अडवले, निषेधार्थ बंदला तुळजापूरात उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 14:57 IST

 सकाळपासूनच संपूर्ण तुळजापूर शहर व्यापाऱ्यांनी व शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : छत्रपती संभाजीराजे यांच्या तुळजाभवानी मंदिरातील अवमान प्रकरणी सर्वपक्षीय व विविध संघटनेच्या वतीने पुकारण्यात  आलेल्या तुळजापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देऊळ कवायत नियमावलीचा दाखल देत छत्रपतींना देवी गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले होते. या प्रकाराचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.

गुरुवारी  सकाळपासूनच संपूर्ण तुळजापूर शहर व्यापाऱ्यांनी व शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले. यामुळे परप्रांतातून आलेल्या भाविक व नवदांपत्यांची खाण्या-पिण्याची मोठी गैरसोय झाली. यासाठी त्यांना बंद हॉटेल चालकांचा आसरा घ्यावा लागला. भाविकांना खाण्यापाण्यासंदर्भात संबंधिताना विचारणा करावी लागली. यावेळी हॉटेल चालक व व्यापारी यांनी शहराच्या बाहेरील  हॉटेल व धाबे उघडे आहेत तेथे जाऊन तुम्ही चहा नाश्ता जेवण करू शकता असे सांगितले. यामुळे खाजगी वाहन धारकांची व्यवस्था होऊ शकली. परंतु एसटीने आलेल्या भाविकांची गैरसोय झाली ही झालेली गैरसोय पाहून शहरातील पुजारी वर्ग  व व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन महाद्वार परिसरात शिरा, केळी व पाणी यांची मोफत व्यवस्था केली.

आजच्या बंदमध्ये मेडिकल दुकानदार, पेट्रोल पंप चालक, टपरीवाले, फळविक्रेते यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. यामुळे तुळजापूर शहरात प्रथमच इतका कडकडीत बंद पाहण्यास लोकांना मिळाला. छत्रपती संभाजीराजे यांच्या अवमान प्रकरणी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली असली तरी मराठा ठोक क्रांती मोर्चा, पुजारी वर्ग यांनी संबंधितावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे शहर बंद नंतर पुढचे पाऊल काय असणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती