शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळा दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१व्या राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त शहरासह जिल्हाभरात विविध उपक्रम राबवून महाराजांना अभिवादन करण्यात आले. ...

उस्मानाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१व्या राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त शहरासह जिल्हाभरात विविध उपक्रम राबवून महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी छत्रपती संभाजी राजे व शिवाजी राजे यांच्या नावे घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

उस्मानाबाद येथे तांबरी विभागातील बजरंग दल शाखेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले, तसेच उपस्थितांना कोरोनापासूनच्या खबरदारीसाठी मोफत मास्क आणि सॅनिटायजर वाटप करण्यात आले. यावेळी जमलेल्या तरुणांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमास संजय देशमुख, ॲड.धीरज कोल्हे, ॲड.नीलेश पाटील, अजय बागल, हेमंत देशमुख, पवन वाटवडे, सचिन शिंदे, प्रा.मनोज डोलारे, प्रा.विवेक कापसे, प्रा.विद्यासागर बागल, बजरंग दलचे महेश बागल, बाळासाहेब जगदाळे, ओम नाईकवाडी, रविकांत बागल, अजय कोळी, प्रवीण निंबाळकर, अभिजीत मगर, शैलेश पाचभाई, सागर देशमुख, सुजीत मुंडे, प्रतीक गायकवाड, सागर पाटील, विवेक निंबाळकर, प्रतापसिंह शेंडगे, सुजीत वडवले, दिनेश सूर्यवंशी, केदार जाधव, कुणाल शिंदे, आकाश कानडे, आकाश खडके, बबलू चौगुले, हनुमंत जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महेश बागल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

छावा प्रतिष्ठान

उस्मानाबाद : तालुक्यातील पाडोळी (आ) येथे छावा प्रतिष्ठानतर्फे राज्याभिषेक सोहळा दिन साजरा करण्यात आला. यावेळी छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषी गुंड, दादा गुंड, सत्यजीत गुंड, हनुमान गुंड, रामा गुंड, अभय गुंड, सूरज पवार, स्वप्निल एकंडे, प्रवीण पवार, रितेश गुंड, गौरव गुंड, तसेच सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच सतीश देटे, ॲड.व्यंकटराव गुंड, उद्योजक आकाश तावडे आदी उपस्थित होते.

क्रांतिवीर सेनेकडून अभिवादन

फोटो (१६-१) गोविंद खुरुद

तुळजापूर : येथील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळ्यास सकाळी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश प्रवक्ते जीवनराजे इंगळे, जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक कुमार टोले, अण्णासाहेब क्षीरसागर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी, महेश चोपदार, प्रशांत इंगळे ,दत्तात्रय सोमाजी, प्रशांत अपराध, राजाभाऊ घाडगे, पृथ्वीराज परदेशी, तुकाराम डोंगर, तुकाराम ढेरे, छावाचे तालुकाध्यक्ष औदुंबर जमदाडे आदी. उपस्थित होते.

बलसूरमध्ये अभिवादन

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथे शनिवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त सुधीर मुर्टे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैरवनाथ चव्हाण, गणेश वाडिकर, विष्णू मुर्टे, नीळकंठ जाधव, चेतन बिराजदार, गोपाळ जाधव, नागेश बनसोडे, किरण पोतदार, पवन पवार, ऋतिक जाधव, योगेश मुर्टे, पिराजी शिंदे, सागर थोरात, राम दुधभाते आदी. उपस्थित होते.