उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते डाॅ. प्रतापसिंह पाटील लिखित ‘भारत आज आणि औद्याेगिक क्रांती पूर्वी’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे मराठवाडा निरीक्षक जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, आमदार विक्रम काळे, भूम-परंडा-वाशीचे माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, नगरसेवक मसूद शेख, तारेख मिर्झा, गटनेते नगरपालिका गणेश खोचरे, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, नगरसेवक प्रदीप घोणे, विवेक घोगरे, नगरसेवक सनी पवार, नगरसेवक मृत्यूंजय बनसोडे, आळणीचे सरपंच बिटू वीर, वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुशील शेळके, नंदकुमार गवारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंतनू खंदारे, शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, शहर विद्यार्थी अध्यक्ष सौरभ देशमुख, प्रवीण तांबे, अमोल सुरवसे आदी उपस्थित हाेते.
भारत आज आणि औद्योगिक क्रांती पूर्वी पुस्तकाचे प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST