शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वार्डातील स्वच्छतागृहात आढळला अस्थमा रुग्णाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:27 IST

या व्यक्तीमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळून येत असल्याने त्यांच्यावर कोरोना कक्षात उपचार सुरु करण्यात आले़ होते

ठळक मुद्देबुधवारी दाखल केले होते रुग्णालयात कोरोनासदृश्य लक्षणे असल्याने स्वॅब घेण्यात आला़

उस्मानाबाद : शहरातीलच विकासनगर भागात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डाच्या स्वच्छतागृहात आढळून आला आहे़ हा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला असून, यामुळे रुग्णालयातच एकच खळबळ उडाली आहे़

उस्मानाबाद शहराच्या विकासनगर भागात राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीस अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास बुधवारी सकाळी ७़३० वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, या व्यक्तीमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळून येत असल्याने त्यांच्यावर कोरोना कक्षात उपचार सुरु करण्यात आले़  बुधवारी रात्रीच या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला़ यानंतर गुरुवारी सकाळी हा व्यक्ती वार्डातीलच स्वच्छतागृहात गेला होता़ बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नसल्याची बाब तेथे कर्तव्यावर असलेल्या एका नर्सच्या लक्षात आली़ तिने स्वच्छतागृह उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कडी लावण्यात आली होती़ शिवाय, कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता़ तेव्हा डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली़ कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडला असता, आत तो व्यक्ती खाली पडला असल्याचे दिसून आले़ डॉक्टरांनी तपासणी केली असता, तो मृत झाल्याचे स्पष्ट झाले़ दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली होती़

मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाहीमयत झालेला व्यक्ती हा बुधवारी रात्री दाखल झाला होता़ त्याला अस्थम्याचा त्रास होता़ शिवाय, कोरोनासदृश्य लक्षणे असल्याने गुरुवारी सकाळी त्या व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे़ मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही़ मयताचा कोरोना अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होऊ शकेल. -डॉ. सतिश आदटराव, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :Deathमृत्यूOsmanabadउस्मानाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या