उस्मानाबाद - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजावर राजकीय आरक्षण गमावण्याची वेळ आल्याचा आराेप करीत भारतीय जनता पार्टी ओबीसी माेर्चाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले. तसेच सरकारविराेधी जाेरदार घाेषणाबाजीही केली.
राज्यातील शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वाराज्य संस्थांतील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. सरकारने याेग्य दिशेने व पूर्ण ताकदीने प्रयत्न केले नाहीत. असे असतानाच आता निवडणूक आयाेगाने धुळे, नंदुरबार, वाशिम, अकाेला व नागपूर या जिल्हा परिषदेतील पाेटनिवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाचे माेठे नुकसान हाेत आहे, असे सांगत बुधवारी भाजपा ओबीसी माेर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने जाेरदार घाेषणाबाजी केली गेली. हे आंदाेलन भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
याप्रसंगी दत्ता कुलकर्णी, ॲड. खंडेराव चौरे, नेताजी पाटील, सुनील काकडे, इंद्रजीत देवकते, ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, रामदास कोळगे, पिराजी मंजुळे, राजसिंह राजेनिंबाळकर, प्रवीण सिरसाठे, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, दत्तात्रय देवळकर, संदीप कोकाटे, अभिराम पाटील, अभय इंगळे, दाजीप्पा पवार, प्रवीण पाठक, सुजित ओव्हाळ, पांडुरंग लाटे, लक्ष्मण माने, बालाजी कोरे, विनायक कुलकर्णी, आशिष नायकल, पांडुरंग पवार, मनोज रनखांब, नामदेव नायकल, प्रशांत रणदिवे, कुलदीप भोसले, वैभव हांचाटे, विनोद निंबाळकर, अमोलराजे निंबाळकर, प्रीतम मुंडे, अर्चनाताई अंबुरे, विद्या माने, देवकन्या गाडे, गणेश एडके, हिम्मत भोसले, अमित कदम, सूरज शेरकर, प्रसाद मुंडे, पोपट राठोड, गिरीष पानसरे, बबलू शेख, सुनील पांगुडवले, सागर दंडणाईक, तेजस सुरवसे आदी उपस्थित हाेते.