तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी व अक्कलकोट तालुक्यातील किणी या सीमेवर आमदार सुजीतसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्योजक तानाजी घोडके यांच्या नेतृत्वाखाली या डेअरी फर्मची सुरुवात होत आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग प्रकल्पाअंतर्गत येथे पाच हजार लीटर दुधावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ निर्माण होणार आहेत. यामुळे अक्कलकोट व तुळजापूर तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवकांना रोजगार तसेच शेकडो शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन घोडके, डेअरी फर्मच्या प्रमुख सुचिता घोडके, सरपंच मीराताई घोडके यांच्या हस्ते फर्मचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी दत्ता घोडके, शिवाजी घोडके, बशीर पटेल, महादेव चेंडके, विलास बाबर, विष्णू घोडके, विजय पाटील, बालाजी पाटील, गुंडू पटेल, शाहूराज जाधव, उमेश चव्हाण, दत्ता निकम, आरिफ पटेल, गजेंद्र हालखंबे, नवनाथ पटणे, शिवराम हालखंबे यांची उपस्थिती होती.
गुळहळ्ळी येथे डेअरी फर्मचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST