अशी होऊ शकते फसवणूक
एका व्यक्तीने गुगलवर साइट सर्च करून ऑनलाइन चप्पल मागविला होता. तो न आवड्याने बदलून दुसरा चप्पल मागविला. मात्र, ऑर्डर देऊनही वस्तू मिळत नसल्याने गुगलवरूनच कस्टमर केअरचा नंबर सर्च करून कॉल केला. १ रुपये खात्यावर टाकण्यात सांगितले. यावेळी त्यांच्या खात्यातून ३५ हजार रुपये गायब झाले.
एका वेबसाइटवरून एका व्यक्तीने ऑनलाइन शेगडी ऑनलाइन खरेदी केली होती, पसंत न आल्याने ती परत केली. या व्यक्तीच्या खात्यावरूनही ७ हजार रुपयांची रक्कम गायब झाली. त्यामुळे अपरिचित साइटवरून अशा वस्तू मागवू नये, ओटीपी शेअर करू नये, असे आवाहन सायबर सेलने केले आहे.
ही घ्या काळजी
१) ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक.
२) आवडलेली वस्तू ऑर्डर करताना सीओडी अर्थात कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडणे.
३) अनोळखी ठिकाणाहून खरेदी करताना केवळ स्वस्त मिळतंय म्हणून एकदम खरेदी करू नये.
४) एखादी वस्तू आवडलेली असेल, तर विश्वासार्ह ॲपवरून घेण्याचा प्रयत्न करा.
५) खरेदी करण्यापूर्वी साइटची माहिती बघणे व साइटला रेटिंग किती मिळाले आहेत याची खात्री करणे.
ऑनलाइन फसवणूक
जानेवारी ४
फेब्रुवारी ५
मार्च ५
एप्रिल २
मे ९
जून ४
जुलै ४
ऑगस्ट ४