शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गूढ आवाजाची शृंखला सुरूच; पंधरा दिवसांत चौथ्यांदा हादरले उस्मानाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:02 IST

हा प्रकार भूकंपाचा निश्चितच नव्हता़ आवाजाचे गूढ शोधण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीतीआवाजाचा शोध लागेना

उस्मानाबाद : जिल्ह्यात गूढ आवाजाची श्रृंखला सुरूच आहे़ मागील १५ दिवसांत चार वेळा जोरदार आवाजाने जिल्हा हादरला आहे़ मंगळवारी दुपारी पुन्हा जोरदार आवाजासह कंप झाला़ या आवाजाचे गूढ प्रशासनालाही उकललेले नाही़ हा भूकंप नव्हता, हे निश्चित असले तरी सर्वसामान्यांमध्ये भीतिचे वातावरण आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात सातत्याने गूढ आवाज होत आहेत़ मंगळवारी दुपारी १़४० वाजता असा जोरदार आवाज होऊन जमीन चांगलीच हादरली़ मागील १५ दिवसांतील हा चौथा प्रकार आहे़ या घटनेने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत़ कोणी भूकंप म्हणून अफवा उठवितात, तर कोणी स्फोट झाल्याची अफवा़ पसरवितात.ध्वनी वेगापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या सुपरसॉनिक विमानांच्या द्वारेही असे सॉनिक बूम घडतात़ त्याचा हा आवाज असल्याचा दावा करण्यात येत आहे़ दरम्यान, लातूरच्या भूकंपमापन केंद्रावर हादऱ्याची कसलीही नोंद मंगळवारी किंवा पूर्वी झालेली नाही़ हे नेमके काय, याचा खुलासा अद्याप प्रशासकीय पातळीवरुन झाला नाही.

गूढ शोधण्यासाठी प्रशासन प्रयत्नशीलआवाजाविषयी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या प्रकाराची माहिती मिळविण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागास कळविल्याचे सांगितले़ शिवाय हा प्रकार भूकंपाचा निश्चितच नव्हता़ आवाजाचे गूढ शोधण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे़ या प्रकाराबद्दल भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

६ नोव्हेंबर : गेल्या पंधरा दिवसांत ६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान उस्मानाबाद परिसराला गूढ आवाजाचा जोरदार हादरा बसला.११ नोव्हेबर : सायंकाळी  ४.३७ वाजता उस्मानाबाद, तुळजापूर आणि लोहारा तालुक्यात गूढ आवाजाचे पुन्हा हादरे जाणवले.१४ नोव्हेबर : सकाळी  १०.१५ वाजता भूम, कळंब, वाशी, परंडा तालुक्यात जोरदार आवाज झाला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादEarthquakeभूकंपUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद