बँका २ वाजेपर्यंत, इतर सेवा ११ पर्यंतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:32 AM2021-04-21T04:32:48+5:302021-04-21T04:32:48+5:30

यापूर्वी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघड्या ठेवण्यास मुभा होती. मात्र, ...

Banks till 2 p.m., other services till 11 p.m. | बँका २ वाजेपर्यंत, इतर सेवा ११ पर्यंतच

बँका २ वाजेपर्यंत, इतर सेवा ११ पर्यंतच

googlenewsNext

यापूर्वी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघड्या ठेवण्यास मुभा होती. मात्र, त्यातही आता बदल करुन वेळ कमी करण्यात आली आहे. किराणा, भाजीपाला, फळ विक्रेते, दुध संकलन व वितरण केंद्र, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने, अंडी, मांस विक्री, कृषि अवजारे व कृषि उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, आगामी पावसाळा ऋतूच्या अनुषंगाने अत्यावश्यक असलेल्या व्यक्ती व संस्थांकरिता अत्यावश्यक असलेल्या साहित्याची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच चालू राहतील. तर नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील व हद्दीच्या बाहेर १० किमी परिघातील पेट्रोलपंपही सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका तसेच पोस्टाच्या सेवा दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांसाठी चालू ठेवता येतील. दुपारी २ नंतर नागरिकांसाठी या सेवा बंद करुन अंतर्गत कार्यालयीन कामकाज करता येईल. याशिवाय, पाणीपुरवठा, विद्युत सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाज हे सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांना कार्यालयात प्रवेश न देता करता येईल, असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे. हे आदेश २० एप्रिल रोजीपासून ते १ मेच्या सकाळपर्यंत लागू असणार आहेत.

Web Title: Banks till 2 p.m., other services till 11 p.m.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.