सेवानिवृत्तीनिमित्त कदम यांचा सत्कार
तुळजापूर - येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत राेखपाल म्हणून कार्यरत असणारे राजेंद्र कदम यांचा नुकताच सेवानिवृत्तीनिमित्त जवाहर तरुण मंडळाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे श्रीकांत धुमाळ, रणजित इंगळे, संताेष इंगळे, राजाभाऊ मगर, बारूळचे उपसरपंच नबीलाल शेख, सतीश भांजी, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संजय ठाेंबरे, अतिश काेरे आदींची उपस्थिती हाेती.
आशा कार्यकर्तींना सुरक्षा किटचे वाटप
कळंब - तालुक्यातील दहिफळ ग्रामपंचायतीच्या वतीने आशा कार्यकर्ती तसेच ग्रामपंचायत कर्मचा-यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती. सदरील किटमध्ये ऑक्सिमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर आदींचा समावेश आहे. साेबतच पीपीई किटचेही वाटप करण्यात आले असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले.
कपिलापुरीत निर्जंतुकांची फवारणी
परंडा - काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन परंडा तालुक्यातील कपिलापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मे राेजी निर्जंतुकांची फवारणी करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, सरपंच वैभव आवाने, उपसरपंच विलास भाेसले, नितीन शिंदे, श्याम मसलकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती हाेती. गावकरी यांनी अकारण घराबाहेर न पडता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच आवाने यांनी केले आहे.