जहागीरदारवाडी येथे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:33 AM2021-04-22T04:33:33+5:302021-04-22T04:33:33+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील जहागीरदारवाडी येथे शिक्षकांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबास भेट घेऊन कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आवश्यक असलेली ...

Awareness at Jahagirdarwadi | जहागीरदारवाडी येथे जनजागृती

जहागीरदारवाडी येथे जनजागृती

googlenewsNext

उस्मानाबाद : तालुक्यातील जहागीरदारवाडी येथे शिक्षकांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबास भेट घेऊन कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आवश्यक असलेली खबरदारी घेण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यासाठी सरपंच शशिकांत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व नानासाहेब पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर गावातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन घरात कोणी वयस्कर व्यक्ती किंवा तरुण व्यक्ती तसेच बालक आजारी आहे का, याची खातरजमा करण्यात आली. कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सतत स्वच्छ पाण्याने हात धुणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणे, संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करणे, स्वच्छता राखणे, शासनाने ठरवून दिलेल्या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करुन घ्यावे यासह इतर उपाययोजना कराव्यात याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी देखील या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद दिला.

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप

(फोटो)

उस्मानाबाद : येथील ब्रह्मतेज सामाजिक संस्थेच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शरीराचे तापमान मोजणाऱ्या मशीनसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. वर्षभरापासून कोरोना महामारीचे संकट सर्वत्र घोंगावत आहे. या कठीण काळात नागरिकांना सुरक्षा देण्याबरोबरच कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरु नये यासाठी चौकाचौकात उन्ह, पावसात सेवा बजावणाऱ्या घेतलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत साळुंके यांनी हे साहित्य वाटप केले. तसेच मागील आठवड्यात शाहूनगर, काकडे नगर, नारायण कॉलनी, संभाजी नगर व गालिब नगर या भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबियांना सॅनिटायझर, मास्क व वाफ घेण्याच्या मशीनचे वाटप केले. यावेळी संस्थेचे दत्तात्रय सोकांडे, युवराज राठोड आदी उपस्थित होते.

झेंडे कुटुंबियास मदतीचा हात (फोटो : २०)

उस्मानाबाद : तालुक्यातील सांजा गावातील नाभिक समाजातील आत्महत्याग्रस्त मनोज झेंडे यांच्या कुटुंबियांना आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने मदतीचा हात म्हणून रोख आर्थिक मदत भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर व महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी महामंडळाचे प्रदेश संघटक किशोर राऊत, मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडित, शहर अध्यक्ष व्यंकट पवार व झेंडे कुटुंबीय तसेच समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Awareness at Jahagirdarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.