शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांनो लक्ष द्या! श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शनवेळ पुन्हा पहाटे ४ वाजेपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:44 IST

गर्दी कमी झाल्याने मंदिर संस्थानने घेतला निर्णय

तुळजापूर (जि. धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिरातील भाविकांची गर्दी आता कमी झाली आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याची वेळही पूर्वीप्रमाणेच पहाटे चार वाजताची करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, अभिषेक घाटच्या वेळेत मात्र कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचेही संस्थानने स्पष्ट केले आहे.

गर्दीचा हंगाम पाहून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पुजाऱ्यांच्या मागणीनुसार तुळजाभवानी मंदिर उघडण्याच्या वेळात बदल केला होता. यानुसार मंगळवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमा तसेच सुट्टीच्या दिवशी भाविकांची गर्दी जास्त राहत असल्यामुळे या दिवशी मंदिर पहाटे एक वाजता उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १२ जुलैपर्यंत करण्यात आली. परंतु, त्यानंतर मागील काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालयांच्या सुट्या संपल्या, शिवाय लग्नसराईदेखील संपल्यामुळे भाविकांची गर्दी रोडावली आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याची वेळ पूर्वीप्रमाणे पहाटे चार वाजता करण्यात आली आहे.

पहाटे सहा वाजता अभिषेक घाटचार वाजता मंदिर उघडल्यानंतर चरणतीर्थ होऊन देवी भाविकांच्या दर्शनासाठी सुरुवात होणार आहे. यानंतर पहाटे सहा वाजता अभिषेक घाट होऊन पंचामृत अभिषेकास प्रारंभ होईल. यात कोणताही बदल केला गेला नाही. या बदलाची महंत, पुजारी, देवी भाविक व सेवेकरी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :dharashivधाराशिवspiritualअध्यात्मिक