शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महिला उपनिरीक्षकाच्या खुनाचा प्रयत्न, कॉन्स्टेबलला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

मनिषा रामदत्त गिरी या महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून उस्मानाबाद शहरातील आनंदनगर ठाण्यात कार्यरत होत्या तेव्हा याच ठाण्यात चालक म्हणून ...

मनिषा रामदत्त गिरी या महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून उस्मानाबाद शहरातील आनंदनगर ठाण्यात कार्यरत होत्या तेव्हा याच ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असलेल्या आशिष ज्ञानाेबा ढाकणे याच्याशी त्यांचा परिचय झाला होता. त्यानंतर गिरी यांची शहर ठाण्यात बदली झाली होती. बदली झाल्याच्या दोन महिन्यांनंतर अनाहूतपणे एक अप्रिय घटना गिरी यांच्याबाबतील घडली. ३१ मे २०१९ रोजी सकाळी गिरी या राहत असलेल्या घरातील चौथ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. ही वार्ता शहरात पसरताच मोठी चर्चा घडून आली. याप्रकरणी आनंदनगर ठाण्यात त्याच दिवशी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद करून घेण्यात आली. या घटनेचा तपास पोलीस उपाधीक्षक मोतीचंद राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने तपास सुरू केला असता हा प्रकार आत्महत्येचा नसल्याचे लक्षात आले होते. मात्र, जखमी मनिषा गिरी या शुद्धीत नसल्याने तपासाला पुरेशी गती मिळू शकत नव्हती. दरम्यान, जवळपास महिनाभराने त्या मानसिकदृष्ट्या ठणठणीत झाल्यानंतर २९ जून २०१९ रोजी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. या जबाबात त्यांनी नोंदविलेल्या बाबी सुरुवातीच्या तपासातील शंकेला पुष्टी देणाऱ्या ठरल्या. आनंदनगर ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असलेल्या आशिष ढाकणे याने गिरी यांना चौथ्या मजल्यावरून ढकलून दिल्याचे जबाबातून स्पष्ट झाल्यानंतर तपास पथकाने त्यास तातडीने ताब्यात घेत ३० जून रोजी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यावर नोंदविण्यात आला. गेली २ वर्षे तो काेठडीतच आहे. या प्रकरणाचा तपास उपाधीक्षक मोतीचंद राठोड यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मनिषा गिरी यांचा जबाब, तपास पथकाने जमा केलेले सबळ पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेत आरोपीवरील गुन्हा सिद्ध होत असल्याने न्यायालयाने आशिष ढाकणे यास ७ खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरत ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच २५ हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने आरोपीस सुनावला. हे प्रकरण पोलीस दलातीलच असल्याने बाहेर त्याची मोठी चर्चा घडून आली होती. त्यामुळे याप्रकरणाच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.