शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कळंब येथे साकारली शिवाजी महाराजांची २० हजार स्क्वेअर फुटाची रांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 16:15 IST

सलग ३१ तास ४५ मिनिटे श्रम...४७२५ किलो रंगीत रांगोळीचा वापर...आणि त्याने एकट्यानेच साकारली १९२०० स्क्वेअर फूट आकाराची छत्रपती शिवाजी महाराज यांची महारांगोळी.

कळंब (उस्मानाबाद ) : सलग ३१ तास ४५ मिनिटे श्रम...४७२५ किलो रंगीत रांगोळीचा वापर...आणि त्याने एकट्यानेच साकारली १९२०० स्क्वेअर फूट आकाराची छत्रपती शिवाजी महाराज यांची महारांगोळी. ही भव्य रांगोळी साकारून महाराजांना मानाचा मुजरा करणाऱ्या या कलावंताचे नाव आहे राजकुमार कुंभार.

तालुक्यातील शिराढोण या गावातील राजकुमार दत्तात्रय कुंभार हा एक अष्टपैलू तरूण. चित्रकार, मृदुमुर्तीकार,पोस्टर आर्टीस्ट ते रांगोळी कला असा वेगवेगळ्या कलेत त्याने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच महारत मिळवलेली आहे. या आधी राजकुमार याने २००० स्क्वेअर फूट आकाराची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची, ७२०० स्क्वेअर फूटाची राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा साकारली. याचे वैशिष्ट्य म्हणजे या रांगोळी साकारताना तो कसलाही मोबदला घेत नाही. केवळ महापुरुषांचे स्मरण व त्यांना अभिवादन करणे हाच एकमात्र उद्देश राजकुमार यातून साध्य करतो. 

एकट्याने साकारली महारांगोळीराजकुमार याने ही महारांगोळी काढण्याचा संकल्प केला असता त्यांना ही रांगोळी कुठे साकारावी याबाबत जागेची अडचण निर्माण झाली. यावेळी कळंब तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग कुंभार हे त्याचे मदतीला धावले. त्यांनी श्रीमंत योगी युवा मंच व मित्र साधना क्रिडा मंडळ यांच्या माध्यमातून रांगोळी साकारण्यासाठीची जागेची अडचण दूर केली.

कळंब येथील क्रिडा संकुलाची विस्तीर्ण जागेची यासाठी राजकुमार याने निवड केली. या ठिकाणी १२० बाय १६० आकारात बॅरीकेंटीग करून आतमध्ये रांगोळी साकारण्यात आली. यासाठी तब्बल ४७२५ किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी सलग ३१ तास ४५ मिनिटे काम करत एकट्या राजकुमार यांनी रेखाटली आहे. 

मान्यवरांच्या हस्ते उदघाटन... या महारांगोळीचे उदघाटन आज सकाळी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितिन कटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसिलदार अशोक नांदलगावकर, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर, रोहित दंडनाईक, बाबुराव पोटभरे, अनंत लंगडे, विलास पाटील, डी. जी. हौसलमल, संदिप बाविकर, मीनाक्षी हजारे, अॅड. राहुल कुंभार आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजrangoliरांगोळीOsmanabadउस्मानाबाद