जयहिंद विद्यालयात कौतुक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:55+5:302021-07-22T04:20:55+5:30

कसबे तडवळे : येथील जयहिंद विद्यालयात दहावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात अंजली विश्वनाथ ...

Appreciation ceremony at Jayhind Vidyalaya | जयहिंद विद्यालयात कौतुक सोहळा

जयहिंद विद्यालयात कौतुक सोहळा

कसबे तडवळे : येथील जयहिंद विद्यालयात दहावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात अंजली विश्वनाथ दळवे, रेणुका सुधाकर गुळवे, श्वेता नवनाथ डोलारे, समीक्षा आनंद सोनटक्के, प्रांजली बालाजी माळी, ऐश्वर्या दिलीप होगले, अनिसा अमजद शेख, आरती गणपत कदम, आकांक्षा गोरोबा धुमाळ, प्रथमेश नृसिंह देशपांडे, स्वप्निल शंकर गडकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पंचायत समिती उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल, सुधीर करंजकर यांचा, तसेच मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.के. गवळी होते. कार्यक्रमास सरपंच मन्मथ आवटे, शालेय समिती उपाध्यक्ष सुनील वळेकर, ग्रा.पं. सदस्य डोलारे, अमर शेख, विकास उबाळे, प्रवीण पालके, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन पंकज ठाकरे यांनी केले, तर आभार प्राचार्य एस.के. गवळी यांनी मानले.

200721\4659img-20210720-wa0030.jpg

जयहिंद विद्यालयात इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

Web Title: Appreciation ceremony at Jayhind Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.