शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट शेती! धाराशिवमध्ये सोयाबीनला 'AI'ची साथ; अतिवृष्टी होऊनही उत्पादनाने गाठली नवी उंची

By चेतनकुमार धनुरे | Updated: April 9, 2026 15:09 IST

राज्यातील पहिलाच प्रयोग धाराशिवमध्ये यशस्वी, २४ टक्क्यांनी वाढले उत्पन्न

धाराशिव : राज्यात उसाच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. मात्र, कोरडवाहू पिकांच्या बाबतीत हा प्रयोग झालेला नाही. धाराशिवच्या कृषी विभागाने आयआयटी मुंबई, परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या साथीने सोयाबीन पिकात एआय तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर केला व तो यशस्वी ठरला आहे. 

पावसाळ्यातील प्रचंड अतिवृष्टी झेलूनही सरासरी उत्पादनात २४ टक्क्यांची वाढ झाल्याचे आढळून आले आहे.धाराशिव जिल्हा हा अवर्षणप्रवण भागात मोडतो. त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे. खरीप पिकांच्या एकूण साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रापैकी सरासरी साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. मागच्या पाच वर्षांमध्ये सलगपणे अतिवृष्टी, दीर्घ खंड, रोगराई, अशा विपरीत स्थितीला तोंड द्यावे लागल्याने २०२५ च्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढून ते पावणेपाच लाख हेक्टरपर्यंत गेले. त्यामुळे कृषी विभागापुढे सोयाबीनची उत्पादकता वाढवण्याचे आव्हान आहे. उसासाठी यशस्वी ठरलेला एआय तंत्रज्ञानाचा प्रयोग लक्षात घेत कृषी विभागाने आयआयटी मुंबई, परभणीचे कृषी विद्यापीठ यांच्या मदतीने सोयाबीनसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेऊन त्याची प्रायोगिक अंमलबजावणी केली. उपळा गावात केलेल्या या प्रयोगाअंती विपरीत हवामान स्थिती असूनही उत्पादनात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

नावीन्यपूर्ण योजनेतून केली तरतूदसोयाबीनमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या प्रयोगासाठी सुमारे ७ लाख रुपयांची आवश्यकता होती. कृषी विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हा नियोजन समितीने नावीन्यपूर्ण योजनेच्या लेखाशीर्षाखाली या निधीची तरतूद करून दिल्याने प्रयोगाला मूर्त स्वरुप मिळाले.

उपळा गावात तंत्रज्ञानाचा प्रयोगसोयाबीनसाठी एआय वापराचा हा पहिलाच प्रयोग होता. कृषी विभागाने यासाठी उपळा गावाची निवड करून तेथील २० शेतकऱ्यांचा गट तयार केला. त्यांच्या प्रत्येकी १ एकराचा प्लॉट तयार करून २० एकर जमिनीवर हा प्रयोग साधण्यात आला. एकाच वेळी लागवड करून पुढील मशागती एआय तंत्रज्ञानाच्या सल्ल्यानुसार केल्या गेल्या.

पावसाचा घाव, तरीही मिळाले यशप्रयोग केलेल्या मागील खरीप हंगामात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातलेला. वार्षिक सरासरी ६०४ मिमी असलेल्या जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत १००० मिमीचा पल्ला ओलांडला. सलग अतिवृष्टीने कहर केला. तरीही एआयच्या सल्ल्यानुसार केलेल्या पीक व्यवस्थापनामुळे एकरी सरासरी दीड ते २ क्विंटल सोयाबीनची उत्पन्न वृद्धी झाली.

व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्नजिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून पहिल्यांदाच सोयाबीनसाठी एआय वापराचा प्रयोग करण्यात आला. ते यशस्वी ठरल्याने भविष्यात याची व्याप्ती वाढवण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न असणार आहे.-राजकुमार मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.

English
हिंदी सारांश
Web Title : AI boosts soybean yields in Dharashiv despite heavy rainfall.

Web Summary : Dharashiv agriculture department successfully used AI in soybean farming, increasing yields by 24% despite excessive rainfall. The innovative project, funded by the District Planning Committee, involved 20 farmers in Uplai village and demonstrates AI's potential in rain-fed agriculture.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र