शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद कारागृहात अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 17:00 IST

अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीमुळे जिल्हा कारागृहात असलेल्या एका १८ वर्षीय आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली.

उस्मानाबाद : अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीमुळे जिल्हा कारागृहात असलेल्या एका १८ वर्षीय आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कळंब पोलीस ठाण्यात योगेश उर्फ रूद्र शिवाजी शिंपले (वय-१८ रा़ चोंदे गल्ली, कळंब जि़उस्मानाबाद)  याच्याविरूध्द अत्याचार प्रकरणी १५ मे रोजी गुन्हा दाखल होता़ पोलिसांनी योगेश शिंपले याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती़ त्यामुळे योगेश शिंपले याला उस्मानाबाद येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहात आज सकाळी नेहमीप्रमाणे सर्व कैद्यांना प्रात:विधी, अंघोळीसाठी सोडण्यात आले होते़ इतर कैदी प्रात:विधी, अंघोळ करून नाष्ट्यासाठी गेले होते़ मात्र, त्याच वेळी योगेश शिंपले याने कारागृहातील सांस्कृतिक हॉलमधील लोखंडी अँगलला टी शर्टने गळफस घेतला.

ही घटना समोर येताच कारागृहात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुख्य न्याय दंडाधिकारी पोटे, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, सीआयडीचे डीवायएसपी चिंतले, पोनि तानाजी दराडे, पोउपनि दादासाहेब सिध्दे यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला़ मयताचे नातेवाईकही घटनास्थही हजर झाले होते़ पंचनाम्यानंतर मयताचे पार्थिव सोलापूर येथील रूग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले़