शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उस्मानाबाद जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ८४ बैठे पथक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 17:49 IST

पथकामध्ये वर्ग एक, वर्ग दोन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.

ठळक मुद्दे२४ हजार ५९ विद्यार्थ्यांची नोंदणीशुक्रवारपासून होणार सुरुवात 

उस्मानाबाद : दहावी परीक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. २४ हजार ५९ विद्यार्थ्यांसाठी जिल्हाभरात ८४ परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी ८४ बैठे पथकांसोबतच १० भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. पथकामध्ये वर्ग एक, वर्ग दोन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी मागील तीन-चार वर्षापासून प्रशासनाकडून तगडे नियोजन केले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून बारावीच्या परीक्षेत आत्तापर्यंत एकही कॉपी केस झालेली नाही. दहावीच्या परीक्षेसाठीही शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या सुचनेनुसार नियोजन केले आहे.

जिल्हाभरातून २४ हजार ५९ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची ही संख्या विचारात घेऊन सुमारे ८४ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक २४ केंद्र आहेत. यानंतर उमरगा ११, लोहारा ८, कळंब १०, भूम ६, तुळजापूर १४, परंडा ८ आणि वाशी तालुक्यात ३ केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रावर कॉपीसारखा गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक तळ ठोकून असणार आहे. परीक्षा संपेपर्यंत पथकाने केंद्र सोडू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अशा बैठे पथकांची संख्या ८४ च्या घरात आहेत.

यासोबतच भरारी पथकांचीही दहावी परीक्षेवर करडी नजर असणार आहे. शिक्षण विभागाने १० पथकांची निर्मिती केली आहे. या पथकात वर्ग एक तसेच वर्ग दोन अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. ही पथके परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देतील. भेटी दरम्यान गैरप्रकार आढळून आल्यास संबंधिता विरोधात कारवाईचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. ही परीक्षा २२ मार्चपर्यंत चालणार आहे.

भरारी पथकाची जबाबदारी निश्चित जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार दहावी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. बैठे पथक तसेच भरारी पथकांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेशी संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी कुचराई केल्यास त्यांच्या विरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

दृष्टीक्षेपात विद्यार्थी संख्यातालुका         संख्याउस्मानाबाद     ६८५७उमरगा        ४०५१लोहारा        २१३८कळंब        २४७३भूम        १९४७तुळजापूर    ३६६०परंडा        २१५४वाशी         ७७०

टॅग्स :examपरीक्षाOsmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद