शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

‘जलजीवन’मधून ९९३ पाणी याेजनेसाठी ३७३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST

उस्मानाबाद - केंद्र सरकारच्या महत्वाकांशी जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७२० गावे आणि २७३ वाड्यांवर प्रती व्यक्ती ५५ लिटर याप्रमाणे ...

उस्मानाबाद - केंद्र सरकारच्या महत्वाकांशी जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७२० गावे आणि २७३ वाड्यांवर प्रती व्यक्ती ५५ लिटर याप्रमाणे नळाद्वारे पाणी पोहाेंचविण्यासाठी ३७३ कोटी १० लाख रूपयांचा आराखडा मंजुर करण्यातआला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांपर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीला नळाद्वारे शुद्ध, शाश्‍वत पाणी पुरवठा

केला जाणार आहे.

यावेळी माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, सभापती दत्तात्रय देवळकर, दत्ता साळुंके,

पंडीत टेकाळे, जि.प. सदस्य बारकुल, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देवकर उपस्थित होते.

अस्मिता कांबळे म्हणाल्या की, जिल्ह्यातील ज्या गावात आजपर्यंत कसलीही पाणीपुरवठा योजना नव्हती किंवा ज्या गावात पाणी पुरवठा योजना होती, त्या गावात वाढीव क्षमतेने योजना राबविली जाणार आहे. या योजनेत वैयक्तीक नळ जोडणीवर भर दिला जाणार आहे. २७३ गावे आणि वस्त्यांवर शाश्‍वत पाणी पुरवठा करण्यासाठी सोलार पंप योजना या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तर २५५ गावांत पाणी पुरवठा योजनांचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी वाढीव पाणी टाकी बांधण्यात येणार आहेत. २९४ गावांत प्रती व्यक्ती ५५ लिटर क्षमतेने पाणी नळाद्वारे पुरविण्यासाठी तर १३९ पाणी पुरवठा योजना नसलेल्या किंवा अर्धवट पाणी पुरवठा असलेल्या गावात त्या गावातील लोकसंख्या आणि त्या गावात सण, यात्रा, उत्सव, आठवडी बाजार किंवा इतर प्रासंगिक कारणाने वाढीव लोकसंख्या गृहीत धरून नवीन पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. ३२ गावांत पहिल्यांदाच पाणी पुरवठा योजना राबविण्याचे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. पहिल्या

टप्प्यात या योजनेतील सर्व योजनांचा सर्वे करण्यात येणार असून सन २०२३-२४ पर्यंत ही योजना पूर्ण करण्यात

येणार आहे. या योजनेला वाॅटरग्रीड योजनेची जोड देण्याची गरज असून जिल्ह्यातील सर्व प्रादेशिक पाणी पुरवठा

योजना असलेल्या गावांना या जलजीवन मिशन मधून स्वंतत्र पाणी पुरवठा योजना मिळून न्याय देता आला याचे

समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट....

सतत दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या आणि विकासाच्या बाबतीत आकांक्षित असलेल्या आपल्या जिल्ह्याला निधी

देताना राज्य सरकारचा हात नेहमीच आखडता राहिला आहे. जिल्हा परिषदेला पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल

दुरूस्तीसाठी केंद्र सरकारचा निधी आला. परंतु राज्याचा निधी आलाच नाही, शेवटी जिल्हा परिषदेने स्व-निधीतून

व्यवस्था केली, असे सांगताना जिल्हा परिषदेला पाणी, शिक्षण आणि आरोग्य याविषयी निधी देताना

राज्य सरकारचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याची टिका, जि.प. अध्यक्षा कांबळे यांनी केली.