जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील तीन खासगी रुग्णालयाच्या इमारती आरोग्य विभागाच्या अधिनस्त डी.पी.सी.एच. म्हणून स्थापन करुन पुढील आदेशापर्यंत अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. उमरगा तालुक्यातील बिराजदार हॉस्पिटलमधील एकूण ३२ खाटा पैकी कोविड बाल रुग्णांसाठी १० खाटा राखून ठेवण्यात आल्या. जाधव हॉस्पिटल मध्ये १० खाटा व उस्मानाबाद तालुक्यातील वात्सल्य चाईल्ड केअर-आय.सी.यू. सेंटरमधील ३५ पैकी यातील १० खाटा अशा एकूण ३० खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक, जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शक सूचनांनुसार यंत्रणा स्थापन करुन संनियंत्रण करावे तसेच ही माहिती डॅश बोर्डवर अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डी.पी.सी.एच. चे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी हे काम पाहतील. राज्य शासन, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून देण्यात आलेल्या आणि देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. असे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी या आदेशात म्हटले आहे.
बाल रुग्णांसाठी तीन खासगी रुग्णालयातील ३० खाटा राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST