शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादच्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी आले 148 कोटी; दिवाळीपूर्वीच होणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 21:43 IST

अतिवृष्टीने जिल्ह्यात 2 लाख 62 हजार हेक्टर्स शेती पिकांचे नुकसान झाले होते.

ठळक मुद्देशासनाकडे 267 कोटी 57 लाख रुपयांची मागणीपहिल्या टप्प्यात नुकसान भरपाईपोटी 148 कोटी 38 लाख रुपये एकूण 4 लाख 6 हजार 447 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार

- चेतन धनुरे

उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात झालेल्या नुकसानीपोटी शासनाने सोमवारी पहिला टप्पा वर्ग केला आहे.  यात १४८ कोटी रुपये देण्यात आले असून, दिवाळीपूर्वीच त्याचे वितरण सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

अतिवृष्टीने जिल्ह्यात 2 लाख 62 हजार हेक्टर्स शेती पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय, मनुष्य, पशुधन मृत्यू, घरांची पडझड असेही नुकसान झाले आहे. एसडीआरएफच्या निकषानुसार प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे 267 कोटी 57 लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, शासनाने सोमवारी नुकसान भरपाईपोटी 148 कोटी 38 लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले आहेत. हा पहिला टप्पा असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी मदत येणार आहे. एकूण 4 लाख 6 हजार 447 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी कौतुभ दिवेगावकर यांनी सांगितले.

कोणासाठी किती मिळणार मदत?एसडीआरएफच्या निकषानुसार कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 6800 रुपये, बागायतीसाठी 18000 रुपये मदत मिळते. शासनाने यात आपलाही वाटा घालून कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी 10000 तर बागायतीसाठी 25000 रुपये देण्याचे निश्चित केले आहे. ही मदत 2 हेक्टरच्या मर्यादेतच मिळणार आहे.

याना मिळतील इतके...मृत पशुधनासाठी मागणीइतकेच 38 लाख 55 हजार रुपये, मयत व्यक्ती, घरांची, गोठ्याची पडझड, संसारोपयोगी साहित्य यासाठी मागणीनुसार 2 कोटी 47 लाख रुपये, खरडून गेलेल्या जमिनीसाठी 11 कोटी 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर कोरडवाहू व बागायती पिकांसाठी जवळपास 202 कोटी रुपयांची मागणी होती, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 91 कोटी रुपये मंजूर करून ते वर्ग केले आहेत. वाढीव मदतीसाठी शासनाने 42 कोटी 61 लाख रुपयांची आपल्या निधीतून तरतूद केली आहे.

टॅग्स :fundsनिधीOsmanabadउस्मानाबाद