शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बेदम मारहाण करून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:27 IST

आईला शिवीगाळ करण्यास मनाई केल्यामुळे एका युवकाला बेदम मारहाण करून जिवे मारल्याची घटना शांतीनगर ठाण्यांतर्गत घडली.

ठळक मुद्देआरोपीला अटक : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आईला शिवीगाळ करण्यास मनाई केल्यामुळे एका युवकाला बेदम मारहाण करून जिवे मारल्याची घटना शांतीनगर ठाण्यांतर्गत घडली.सागर खुशाल डाबरे (२६) असे मृताचे नाव आहे. तर आरोपी वीरू गुणवंत चांदेकर (३२) रा. लालगंज हा आहे. सागर किराणा दुकानात काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आई आणि लहान भाऊ आहे. सागरच्या आईची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याने दोन महिन्यांपूर्वी शांतीनगर पोलिसांच्या मदतीने आपल्या आईला मनोरुग्णालयात भरती केले होते. काही दिवसांनंतर त्याच्या आईला मनोरुग्णालयातून सुटी मिळाली. ९ मार्चला दुपारी वीरूने सागरला त्याच्या आईवरून शिवीगाळ करून अपशब्द वापरले. त्याने सागरला धमकीही दिली. यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सागरने आईला शिवीगाळ करून अपशब्द वापरण्यास मनाई केली. यामुळे वीरूने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सागरने स्वत:ला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु मारहाणीत सागरला गंभीर दुखापत झाली. वस्तीतील नागरिकांनी सागरला खासगी रुग्णालयात पोहोचविले. तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले. शांतीनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून वीरूला अटक केली आहे. या घटनेमुळे सागरच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याची आई मनोरुग्ण असून भाऊ मजुरी करतो. त्यांची देखभाल करणारा कुटुंबात कोणीच नाही. किरकोळ वादातून वीरूने त्याला मारहाण केली. मारहाणीमुळे सागरच्या चेहरा, डोके, छाती आणि पोटावर गंभीर जखमा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून