शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पेल्हारमध्ये अपहरण करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2024 17:48 IST

पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याची पोलिसांना संशय

-मंगेश कराळे

नालासोपारा:- कांदिवली येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचे आरोपींनी गुरुवारी रात्री अपहरण करून गौराईपाड्यातील पार्किंगच्या मोकळ्या जागेत धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. पेल्हार पोलिसांनी शुक्रवारी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.

कांदिवलीच्या मारुती चाळीत राहणारा सुधीर सिंग (२७) आणि वालईपाडा रोडवरील उपाध्याय चाळीत राहणारा वैभव मिश्रा (२८) हे दोघे गुरुवारी गौराईपाडा परिसरात रूम बघण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी रोहन सिंग, मर्दा व इतर ६ ते ७ सोबतच्यांनी दोन रिक्षांमधून येऊन कोणत्यातरी कारणावरून सुधीरचे अपहरण करून नेले. गौराईपाडा परिसरातील यादवेश विद्यालयाच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत आरोपींनी अंगावर कोयता, दुसरे धारदार हत्याराने वार करून लाकडी बांबू व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याने गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले आहे. सुधीर हे पाच वर्षांपूर्वी पांडे नगर परिसरात राहत होता. आता तो कांदिवली येथे परिवारासोबत राहत होता.

१) सदर हत्या ही पूर्व वैमनस्यातून झाल्याची शंका आहे. हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेत गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. आरोपी पकडल्यानंतर ही हत्या नेमकी कश्यामूळे झाली त्याचा उलगडा होईल. - वसंत लब्दे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार