शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील व्ही सेक्टरमध्ये जुन्या वादातून तरुणावर गोळीबार; आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2023 15:47 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की आकाश तवर व सोपान राजपूत हे दोन्ही जुने मित्र आहेत.

जळगाव शहरातील एमआयडीसीतील फी सेक्टरमध्ये दोन मित्रांमध्ये असलेल्या जुन्या वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबाराच्या या घटनेने जळगाव शहर पुन्हा हादरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की आकाश तवर व सोपान राजपूत हे दोन्ही जुने मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी सोपान राजपूत याने आकाश तवर याच्याबद्दल पोलिसांच्या डायल ११२ या क्रमांकावर आकाश तवर याच्याबद्दल तो बदनामी करत असल्याची तक्रार केली होती. या रागातून आकाश याचा मित्रांनी सोपान राजपूतला मारहाण केली होती. याच जुन्या वादातून सोपान राजपूत नाही आज आकाश तवर याला एमआयडीसीतील व्ही सेक्टर या ठिकाणी गाठल व त्याच्याशी शिवीगाळ तसेच भांडण करत सोपान राजपूत याने थेट पिस्तूल काढलं. आणि आकाश याच्या दिशेने गोळीबार केला. आकाश याने तो गोळीबार चुकवला आणि या ठिकाणाहून पळ काढला. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सोपान राजपूत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सोपान राजपूत याने दोन राऊंड फायर केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.  दरम्यान गेल्या महिन्यात जळगाव शहरातील शिवाजी नगर मध्ये गोळीबाराच्या दोन घटना घडल्या होत्या. आता पुन्हा आजच्या घटनेने जळगाव शहर हादरले.

टॅग्स :Jalgaonजळगाव